एमराल्ड स्कूल अकोला तसेच एमराल्ड सिटी खामगाव  चे संचालक 

संजय तुलशान यांची लॉयन्स अन्न छत्र ला एक लाख रुपये देणगी

जनोपचार न्यू नेटवर्क (नितेश मानकर) खामगाव: - खामगाव येथील शेगाव खामगाव रोड वरील एमराल्ड सिटी लेआउट चे संचालक मालक तसेच अकोला येथील काच घर, तुलशान प्लायवूड आणि *एमराल्ड स्कूलचे संचालक  श्री संजय दिनेशचंद्र तुलशान यांनी लायन्स क्लब खामगाव द्वारा मागील 9 वर्षा पासून निरंतर संचालित लायन्स अन्नछत्रला सदिच्छा भेट दिली आणि लायन्स क्लब खामगाव च्या या लोकोपयोगी उपक्रमाचे कौतुक केले तसेच या सेवाभावी प्रकल्पासाठी त्यांनी स्वयंस्फूर्त ₹१००००० ( एक लक्ष रुपये) देणगी देण्याची इच्छा व्यक्त करून लगेच एक लाख रुपयाचा धनादेश लायन्स क्लब खामगाव च्या अन्नछत्र टीम कडे दिला .

त्यांच्या या भेटीदरम्यान लायन्स क्लब खामगाव या वतीने त्यांचा शाल व श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. 

या प्रसंगी प्रास्ताविकात माजी प्रांतपाल ला. डा. अशोक बावस्कर यांनी लायन्स क्लब खामगाव चे माध्यमातून सुरू असलेल्या विविध समाजोपयोगी सेवा कार्याची माहिती दिली. 

यावेळी लायन्स क्लब खामगाव चे अध्यक्ष ला तुषार कमानी,सचिव ला गिरीश पवार, पूर्व प्रांतपाल ला डॉ अशोक बावस्कर,अन्नछत्र टीम चे ला किशोर गरड, ला दिनेश गांधी, ला गिरीश धरमठोक,ला निखिल लाठे,ला नंदकिशोर देशमुख, ला शंकर परदेशी,ला नरेंद्र सिंग छाबरा,ला मितेश कमानी, ला लुकेश मुद्दलियार,ला निलेश पाटील  उपस्थित होते

या कार्यक्रमाचे संचालन ,आभार प्रदर्शन लायन्स अन्नछत्र टीम चे.  लॉ किशोर गरड यांनी केले

Post a Comment

Previous Post Next Post