खामगाव संस्कृतीचा 'सुवर्ण' धमाका! भुसावळ येथील रिजन कॉन्फरन्स मध्ये 24 हून अधिक पुरस्कारांवर कोरले नाव
खामगाव (प्रतिनिधी): समाजसेवेचा वसा घेतलेल्या लायन्स क्लब खामगाव संस्कृतीने आपल्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. रविवार, २५ जानेवारी २०२६ रोजी भुसावळ येथे संपन्न झालेल्या भव्य प्रादेशिक परिषदेत (Region Conference) खामगाव संस्कृती क्लबने आपल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर तब्बल २४ हून अधिक श्रेणींमध्ये पुरस्कार पटकावून संपूर्ण प्रांतात दबदबा निर्माण केला आहे.मान्यवरांची उपस्थिती आणि मार्गदर्शनया भव्य सोहळ्याचे अध्यक्षपद रिजन चेअरपर्सन लायन डॉ. उमाकांत चौधरी यांनी भूषवले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डिस्ट्रिक्ट ३२३४ H2 चे प्रांतपाल (District Governor) पीएमजेएफ लायन अश्विन कुमार बाजोरिया यांची विशेष उपस्थिती होती.
याप्रसंगी की-नोट स्पीकर म्हणून लाभलेले डिस्ट्रिक्ट ३२३३ C चे पीएमजेएफ पीडीजी एफडीआय लायन सत्येंद्र शर्मा यांनी 'लायनिझम' या विषयावर उपस्थितांना अनमोल मार्गदर्शन केले. व्यासपीठावर सन्माननीय अतिथी म्हणून आयपीडीजी पीएमजेएफ लायन गिरीश सिसोदिया आणि एफव्हीडीजी पीएमजेएफ लायन राहुल औसेकर यांची देखील प्रमुख उपस्थिती होती. या सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते खामगाव संस्कृतीच्या सदस्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
नेतृत्वाचा गौरव: वैयक्तिक पुरस्कारांची लयलूटक्लबच्या अनुभवी आणि समर्पित सदस्यांनी आपल्या कार्यकुशलतेने परिषदेचे लक्ष वेधून घेतले:
पीएमजेएफ लायन नरेश चोपडा: यांनी 'बेस्ट कॅबिनेट ऑफिसर', 'बेस्ट डिस्ट्रिक्ट चेअरपर्सन', 'बेस्ट इन्फॉर्मेटिव्ह लायन' आणि 'बेस्ट लायन ऑफ द रिजन' असे महत्त्वपूर्ण किताब पटकावले.
एमजेएफ लायन सूरज अग्रवाल: यांना 'बेस्ट कॅबिनेट ऑफिसर' आणि 'बेस्ट लायन ऑफ द रिजन' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
एमजेएफ लायन उज्ज्वल गोयंका: यांनी 'बेस्ट कॅबिनेट ऑफिसर' म्हणून आपली छाप पाडली.
एमजेएफ लायन अभय अग्रवाल: यांना 'बेस्ट झोन चेअरपर्सन (ZC) एप्रिसिएशन' पुरस्कार मिळाला.
लायन राजकुमार गोयंका: यांना 'बेस्ट पीआरओ (PRO)' पुरस्काराने गौरविण्यात आले.
प्रशासकीय शिस्त आणि आर्थिक पारदर्शकता:
क्लबच्या प्रशासकीय कामात मोलाची भूमिका बजावणारे लायन डॉ. निशांत मुखिया (बेस्ट क्लब सेक्रेटरी) आणि लायन सीए आशिष मोदी (बेस्ट क्लब ट्रेझरर) यांना 'प्लॅटिनम अवॉर्ड' देऊन सन्मानित करण्यात आले.
सेवाकार्यात 'प्लॅटिनम' भरारी
खामगाव संस्कृतीने सामाजिक बांधीलकी जपताना खालील श्रेणींमध्ये सर्वोच्च प्लॅटिनम पुरस्कार मिळवले:
प्रांतातील सर्वोत्तम कायमस्वरूपी प्रकल्प (Best Permanent Project)
सर्वोत्तम क्लब (Best Club of Region)
मानवतावादी सेवा आणि भूकमुक्ती उपक्रम (Best Humanitarian Service & Hunger Activity)
आर्थिक शिस्त आणि एलसीआय रिपोर्टिंग (Financial Discipline & LCI Reporting)
एलसीआयएफ (LCIF) प्रमोशन आणि प्रतिमा संवर्धन (Image Building)
याशिवाय 'गोल्ड' श्रेणीमध्ये ऑक्टोबर सेवा सप्ताह, सदस्य संख्या वाढ आणि रिजनल चेअरमन वाढदिवस उपक्रमांसाठी क्लबचा गौरव करण्यात आला. जुलै महिन्यातील उत्कृष्ट जीएसटी (GST) कार्यासाठीही विशेष गौरव करण्यात आला.
क्लबचे अध्यक्ष लॉ आकाश अग्रवाल यांनी प्रतिक्रिया देतांना सांगितले की "हे यश केवळ एका व्यक्तीचे नसून संपूर्ण खामगाव संस्कृती परिवाराच्या टीमवर्कचे आणि जनसेवेप्रती असलेल्या निष्ठेचे फळ आहे. भविष्यातही आम्ही अशाच उत्साहाने समाजातील शेवटच्या घटकापर्यंत मदत पोहोचवू.". अशी माहिती क्लब प्रसिध्दी प्रमुख लॉ राजकुमार गोयनका यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

إرسال تعليق