आदर्श ज्ञानपीठ येथे सावित्रीबाई फुले जयंती आदरांजली अर्पण करून साजरी 

जनोपचार न्यूज नेटवर्क खामगाव :- घाटपुरी नाका  परिसरातील माँ सरस्वती मंदिराजवळील संस्कार व शिक्षण यांचा उत्तम संयोग असणारी शाळा म्हणून नावलौकिक प्राप्त असलेली आदर्श ज्ञानपीठ इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज खामगाव येथे *3/01/2026* रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. 

         कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व  स्वर्गीय विजयाबाई राजपूत   यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून व  संस्थेचे सदस्य कविश्वरसिंह राजपूत  यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ अनिता पळसकर मॅडम यांनी विद्यार्थ्यांना समाजहित व स्त्री शिक्षणाचे महत्त्व  समजावून दिले. तसेच आदर्श शाळेचे तत्व कायम गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना तसेच स्त्रियांना पाठिंबा देणे व त्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देऊन संधी देणे एवढे निर्मळ व स्वच्छ आहे. आदर्श ज्ञानपीठाची पायाभरणी करणाऱ्या स्वर्गीय सौ  विजयाबाई राजपूत मॅडम  यांनी कायम समजहिताचे स्वप्न रंगविले व आज ते खऱ्या अर्थाने पूर्ण देखील झाले. त्यांची कायम तीव्र इच्छा  होती सर्व वयोगटातील स्त्री वर्गाने खंबीर व्हावे, स्वावलंबी व्हावे आणि आज आदर्श ज्ञानपीठ शाळेत सर्व वयोगटातील स्त्री वर्ग यशस्वीरीत्या कार्यरत आहे. असे मनोगत प्राचार्या सौ अनिता पळसकर यांनी मांडीले.

         क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची ज्योत पेटवली आणि ती कायमस्वरूपी तेवत ठेवण्याचे कार्य सर्व शिक्षेकेंनी करावे आणि हिच खऱ्या अर्थाने सावित्रीबाईंना श्रद्धांजली असेल. असे विचार शाळेच्या पर्यवेक्षिका प्रियंका राजपूत यांनी मांडीले.

        कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शना द्वारे नव्हे तर आदर्शच्या संपूर्ण स्टाफ ने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना साक्षी ठेवून,  समाजकार्याची व शिक्षणाची ज्योत कायम तेवत ठेवू अशी प्रतिज्ञा घेतली व आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना फुले दांपत्यासारखे समाजहित समाज परिवर्तन व शिक्षणाचे महत्त्व त्यांच्या अंगी बनविण्याचे कार्य पूर्ण निष्ठेने पूर्ण करू अशी शपथ घेतली व  महावंदनीय आदरणीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व स्वर्गीय विजयाबाई राजपूत मॅडम यांना आदरांजली अर्पण केली. 

         कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता शाळेच्या प्राचार्या सौ अनिता पळसकर मॅडम,  पर्यवेक्षिका सौ. प्रियंका राजपूत मॅडम,  ज्येष्ठ शिक्षिका सौ ममता महाजन मॅडम तसेच सौ ज्योती वैराळे मॅडम  कु. माधुरी उगले मॅडम,सौ अलका वेरूळकर मॅडम, सौ प्रिया देशमुख, सौ सारिका सरदेशमुख मॅडम, सौ अक्षया इरतकर मॅडम, सौ अर्चना लाहुडकर  मॅडम, कु. काजल होणवलकर श्रीमती नर्मदा धांडे मॅडम, सौ श्वेता आवारे मॅडम, सौ वर्षा मोरे मॅडम, सौ. अलका राऊत मॅडम, सौ. पूनम कासलीवाल मॅडम,सौ दिव्या पटारे मॅडम, श्री ढोले सर, श्रीमती सपना हजारे, सौ. संगीता पिवळटकर, सौ सुवर्णा वदोडे, सौ प्रतिभा गावंडे, सौ. अंजली रत्नपारखी आदींचे योगदान मिळाले.

Post a Comment

Previous Post Next Post