खामगांव येथील सौ. लता अशोक गोयनका "अग्र-प्रभा २०२६ " पुरस्काराने सन्मानीत
जनोपचार न्यूज नेटवर्क खामगांव - दि.३ व ४ जानेवारी रोजी नांदेड येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय संमेलनामध्ये खामगांव येथील सौ. लता अशोक गोयनका यांना अग्र-प्रभा २०२६ च्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
खामगांव येथील पारधी आश्रम जवळपास २०० ते २५० विद्यार्थीनी शिक्षण घेत असुन शाळेत २००० लिटरची पाण्याची टाकी व २०० लिटर आर.ओ. त्यांच्याकडून लावण्यात आला असुन वॉटर कुलरद्वारे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून दिली तसेच १४ सिलींग फॅन व विद्यार्थीनींना झोपण्याकरीता गादीची सुध्दा व्यवस्था करण्यात आली आहे.
पळसखेड उंद्री येथील अनाथ आश्रम शाळेत १५० स्त्री पुरूष असुन त्यांच्यातील कित्येक लोक हे विक्षिप्त आहे त्यामधील ४० महिलांकरीता गाऊन तसेच खाण्या पिण्याच्या साहित्याचे वितरण अग्रवाल महिला मंडळ खामगांव यांच्या मार्फत करण्यात आले आहे व जरूरतमंद महिलांना शिलाई मशिन सुध्दा देण्यात आली.
सौ. लता अशोक गोयनका ह्यांनी अग्रवाल महिला मंडळाचे अध्यक्ष व लॉयन्स क्लब खामगांवचे सुध्दा अध्यक्षपद भुषविले. या कालावधीत त्यांनी अनेक समाजोपयोगी प्रकल्पाचे संचालन केले. त्यांची आपले जीवनात सदैव मानव सेवा केली. सौ. लता गोयनका यांना अग्र-प्रभा २०२६ पुरस्कार प्राप्त झाल्याने त्याचे सर्व स्तरावरून कौतुक करण्यात येत आहे.

Post a Comment