ब्राह्मण सभेत संक्रांत निमित्त भोगीचे जेवण
जनोपचार खामगाव :- महाराष्ट्र ब्राम्हण सभा महिला मंडळ च्या वतीने मकर संक्रात निमित्त 4 जानेवारी रोजी भोगीचे जेवण महिला सभासद यांच्या करिता ठेवण्यात आले होते. यावेळी कावडकर काकू व अदिती ताई गोडबोले टिळक स्मारक महिला मंडळ ह्या उपस्थित होत्या. काकूंच्या व ब्राम्हण सभा महिला मंडळ अध्यक्षा यांचे हस्ते दीपप्रज्वलन केले. तसेच नगरसेविका सौ. डोरले ताई यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाप्रसंगी सौ. अनिता ताई देशपांडे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी वक्त्यांनी असेच महिलांचे कार्यक्रम नेहमी होत राहो यासाठी शुभेच्छा देत उपस्थितानी उत्साहाने सहभाग घेतला व महाराष्ट्र ब्राम्हण सभेचे विशेष आभार मानले. सहभोजनानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.





إرسال تعليق