खामगाव ITI आणि लायन्स क्लब संस्कृती यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन
जनोपचार न्यूज नेटवर्क खामगाव : येथील सतगुरु श्री आगाशे काका शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) आणि लायन्स क्लब संस्कृती, खामगाव यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, दिनांक ०२ जानेवारी २०२६ रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, एकूण ४५ हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली.
संस्थेच्या नवीन इमारतीमधील खोली क्र. ६ मध्ये सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत हे शिबिर पार पडले. शिबिराचे उद्घाटन संस्थेचे प्राचार्य श्री. विनय काळे सर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी श्री. संदीप पिसे यांनी रक्तदानाचे महत्त्व विशद केले. "रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान असून, तुमच्या रक्ताचा एक थेंब कोणाचे तरी प्राण वाचवू शकतो. अशा उपक्रमांमुळे गरजू रुग्णांना मोठा आधार मिळतो," असे मत त्यांनी व्यक्त केले.
अध्यक्ष आकाश अग्रवाल यांचा वाढदिवस अनोख्या उपक्रमातून साजरायोगायोगाने आज लायन्स क्लब संस्कृती, खामगावचे अध्यक्ष पीएमजेएफ लॉ आकाश अग्रवाल यांचा वाढदिवस असल्याने, संस्थेच्या वतीने त्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. आपला वाढदिवस अशा सेवाभावी कार्याने साजरा केल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
उपस्थित मान्यवर व सहकार्य
हे शिबिर यशस्वी करण्यासाठी संस्थेचे वरिष्ठ गट निदेशक श्री. जितेंद्र काळे सर यांनी विशेष परिश्रम घेतले. याप्रसंगी लायंस क्लब खामगांव संस्कृति चे सचिव डॉ. निशांत पी. मुखीया, कोषाध्यक्ष सीए आशीष मोदी, लॉ शैलेश शर्मा, लॉ निशिकांत क़ानूगो, लॉ संदीप पंडा, लॉ सौ संतोषी संदीप पंडा ज्यांनी सुद्धा रक्तदान केले, गट निदेशक श्री. नंदकिशोर गावंडे सर, NSS अधिकारी श्री. संदीप पिसे सर व श्री. संतोष होवाळ सर, श्री. संदीप विचे सर, श्री. गजानन इंगळे सर आणि संस्थेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.
रक्त संकलनाचे कार्य सोनी पॅथॉलॉजी लॅबचे प्रमुख डॉ. गोपाल सोनी आणि त्यांच्या तांत्रिक पथकाने पार पाडले. जमा झालेले ४५ युनिट रक्त सोनी पॅथॉलॉजी ब्लड बँककडे सुपूर्द करण्यात आले आहे. भविष्यात कोणालाही रक्ताची गरज भासल्यास तातडीने मदत करण्याची ग्वाही डॉ. गोपाल सोनी यांनी यावेळी दिली.
या यशस्वी उपक्रमाबद्दल आयटीआय प्रशासन आणि लायन्स क्लबच्या सर्व सदस्यांचे परिसरात अभिनंदन होत आहे. अशी माहिती क्लब प्रसिध्दी प्रमुख लॉ राजकुमार गोयनका यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली

إرسال تعليق