प्रा. रामकृष्ण गुंजकर यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी शिबिर

जनोपचार न्यूज नेटवर्क खामगाव - स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय संस्थेद्वारे संचलित जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर्स चे अध्यक्ष प्रा.श्री.रामकृष्ण गुंजकर सर यांच्या वाढदिवसानिमित्त आज दि:०१/०१/२०२६ वार गुरुवार रोजी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते 



 या शिबिराला डॉ.अमोल आढाव(वैद्यकीय अधिकारी),डॉ.ममता कुमावत (वैद्यकीय अधिकारी),जावेद खान (फार्मसिस्ट),सपना मुंढे (परिचारिका) यांचे मार्गदर्शन लाभले.  या मध्ये विद्यार्थ्याचे आरोग्य तपासणी, किरकोळ आजारावर औषधोपचार, गंभीर आजारी विद्यार्थ्यांना संदर्भ सेवा, विद्यार्थ्यांना पोषक आहार व वैयक्तिक स्वच्छता याबाबत मार्गदर्शन, आणि किशोरवयीन मुलींना आरोग्यविषयक माहिती व मार्गदर्शन, सपुपदेशन इत्यादी विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिराला प्रमुख उपस्थिती म्हणून संस्थेचे अध्यक्ष प्रा.श्री.रामकृष्ण गुंजकर सर, संस्थेच्या सचिवा प्रा.सौ.सुरेखा गुंजकर मॅडम,ज्यू.कॉलेजचे प्राचार्य.श्री.सतीशजी रायबोले सर,शाळेचे मुख्याध्यापक श्री.रवींद्रजी मांडवेकर सर,उपमुख्याध्यक श्री.संतोष अल्हाट सर तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم