समृद्धी महामार्गावर लक्झरी पेटली: वडी येथील चालकाचा जागीच मृत्यू
जनोपचार न्यूज नेटवर्क खामगाव.. रात्री उशिरा संभाजीनगर वैजापूर या समृद्धी महामार्गावर घडलेल्या लक्झरी अपघातात नांदुरा तालुक्यातील वडी येथील लक्झरी चालक अमोल शेलकर याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे वडी गावात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार अमोल शेलकर हा लक्झरी चालक असून तो लक्झरी घेऊन जात असताना संभाजीनगर वैजापूर मार्गादरम्यान लक्झरी बसणे पेट घेतला. या बस मध्ये आणखी प्रवासी असून केबन मधील दोन ते तीन जण भाजल्या गेल्याचे वृत्त आहे. अमोल हा खामगाव येथील घाटपुरी येथे वास्तव्यास होता.

إرسال تعليق