वकील संघ अंबाजोगाईचे इतिहासात प्रथमच स्नेहसंमेलन उत्साहात -ऍड.अजित लोमटे अध्यक्ष
अंबाजोगाई:- वकिली सारख्या रुक्ष जीवनात काही कर्मणुकीचे क्षण असावेत या उद्देशाने वकील संघ आंबेजोगाई मार्फत वकील संघाचे अँड.अजित लोमटे यांच्या संकल्पनेतून गेल्या 74 वर्षात कधी नव्हे ते यावर्षी स्नेहसंमेलन चे आयोजन करण्यात आले होते या संमेलनास दिनांक 11/ 1/ 2026 रोजी क्रिकेटच्या सामन्याने सुरुवात करण्यात आली या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन माननीय जिल्हा न्यायाधीश श्री.भस्मे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले यानंतर या स्नेहसंमेलनात हॉलीबॉल, बॅडमिंटन ,कॅरम ,बुद्धिबळ लुडो यासह रांगोळी स्पर्धा, संगीत खुर्ची, चित्रकला स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले तर दिनांक 17/ 1 /2026 रोजी सांस्कृतिक कार्यक्रमाने या स्नेहसंमेलनाचा समारोप करण्यात आला समारोपाच्या दिवशी वकील संघ अंबाजोगाई मार्फत काव्यवाचन , गीत गायन, तसेच नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते समारोपाच्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माननीय न्यायाधीश भस्मे साहेब माननीय न्यायाधीश. श्रीमती डॉ. तेहरा मॅडम यासह जेष्ठ विधीज्ञ ॲड. शिवाजीराव कराड साहेब तसेच ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. सुधाकरराव चिखलीकर साहेब यांची उपस्थिती होती या कार्यक्रमाच्या आयोजनात वकील संघाचे अध्यक्ष ॲड. अजित बापू लोमटे उपाध्यक्ष ॲड. दिलीप गोरे सचिव ॲड. रविकांत सापते, सहसचिव ॲड. बळीराम पुरी , ग्रंथपाल ॲड.शोएब यांनी मेहनत घेतली तर समारोप सत्राचे सूत्रसंचालन ॲड. पुष्पा धायगुडे मॅडम ॲड. स्नेहल नागरगोजे मॅडम व ॲड. बळीराम पुरी यांनी केले. या कार्यक्रमात वकील संघातील सर्व सदस्य, सर्व न्यायाधिश, तसेच न्यायालयीन कर्मचारी यांनी हरेरिने सहभाग नोंदविला या कार्यक्रमाच्या यशस्वी साठी सर्व वकील संघाचे पदाधिकारी कार्यकारणी तसेच वकील संघाचे लिपिक सिद्धेश्वर स्वामी यांनीही मेहनत घेतली व वकील संघ अंबाजोगाई चे स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले.

Post a Comment