पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद नाही..!
बंद घरातून दोन लाखाचे दागिने लंपास
जनोपचार न्यूज नेटवर्क खामगाव: बाहेरगावी जाताना पोलिसांना माहिती द्या असे आवाहन अनेक वेळा करण्यात आले मात्र नागरिकांकडून प्रतिसाद मिळत नाही त्यामुळे चोरांचे फावते आणि बंद घरातून दागिने लंपास होण्या च्या घटनेला उजाळा मिळतो. बंद घरातून दोन लाखाचे दागिने लंपास झाल्याची घटना नुकतीच खामगाव शहरात उघडकीस आली आहे.
सिंधी कॉलनी भागातील रवी होतवाणी यांचे काका हे पुणे येथे गेल्या तिन वर्षापासुन रहीवासी असुन त्यांचे बंद घराचे बाजुलाच रवी होतवाणी हे सहपरीवारासह राहतात घटनेच्या दिवशी रात्री झोपन्यापुर्वी रवी होत वाणी यांनी त्यांच्या काकांचे घर बघीतले असता त्यांना घराचे कुलूप सुस्थीतीत लावलेले दिसले. दुस-या दिवशी सकाळी बघीतले की त्यांचे काका चे घराचे कुलुप तुटलेल्या अवस्थेत दिसून आले. घराचा दरवाजाही उघडा आहे त्यांनी आत जावुन बधीतले असता त्यांना काकाचे घरातील दागिने कि.अ.2.04000/-रु किंमतीचा कोणीतरी अज्ञात चोरट्याने बंद घराचे कुलूप तोडुन घरात प्रवेश करुन चोरून नेल्याचे दिसुन आले अशा रिपोर्टवरुन खामगाव शहर पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध अप 49/2026 कलम 305 (अ), 331(4) BNS नुसार गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.
असे दागिने चोर त्यांनी कंपास केले :- 1) सोन्याचे कंगन 50 ग्रॅम 2 नग जु.वा.कि.अ.15000/-रु 2) सोन्याचे कगन 30 ग्रॅम 2 नग जु. वा. कि.अ.9000/-रु 3) सोन्याचे कंगन 30 ग्रॅम 2 नग जु.चा. कि.अ.9000/-रु 4) सोन्याची अंगठी 30 ग्रॅम 6 नग जु.वा.कि.अ.9000/-रु 5) सोन्याची चैन 20 ग्रॅम 1 नग जु.बा. कि.अ.6000/-रु 6) सोन्याचा नेकलेस 20 ग्रॅम 1 नग जु.वा.कि.अ.6000/-रु एक वर्षापुर्वी घेतलेले 7) सोन्याची चैन 10 ग्रॅम 1 नग जु.वा.कि.अ.70,000/-रु 8) सोन्याचे मंगळसुत्र 10 ग्रॅम 1 नग जु.वा.कि.अ.80,000/-रु असे एकुण 200 ग्रॅम सोन्याचे दागिने जु.बा. कि.अ.204000/-रु

Post a Comment