सर्वज्ञ ज्ञानपीठ मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात
सर्वज्ञ ज्ञानपीठ रोहना येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या हर्ष उल्हास साजरा तालुक्यातील रोहना येथील सर्वज्ञ ज्ञानपीठ येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या हर्ष उल्हासने साजरा करण्यात आला सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष संभाजीराव टाले हे होते तर प्रमुख उपस्थितीत समाजसेवक प्रवीण भाऊ कवीश्वर व श्री वाकुडकर हे होते सर्वप्रथम मान्यवरांनी आदरणीय प्रेरणादायी स्वर्गीय डॉ.बाबासाहेब कवीश्वर यांच्या समाधीवर पुष्प अर्पण करुन दर्शन घेतले. त्यानंतर पुढील कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी सर्वज्ञ ज्ञानपीठाच्या विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त सुंदर असे भाषणे केली
तर अनेक विद्यार्थ्यांनी अनेक देश भक्ती गीतांवर सुंदर समूह नृत्य सादर केले यावेळी संपूर्ण वातावरण हे देशभक्तीमय झाले होते यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष संभाजीराव टाले यांनी विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व तसेच मौलिक शैक्षणिक मार्गदर्शन सुद्धा केले. ज्ञानपीठाने गेल्या काही दिवसांपासून शालेय विद्यार्थ्यांच्या शारीरिक व बौद्धिक विकासाकरिता काही स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते त्या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करून त्यांचा उत्साह वाढवण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापिका सौ वर्षाताई श्रीराम इंगोले यांनी केले तर या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षिका सौ सुनीता बंड, सौ करूणा कांडेकर, सौ दिपाली बोचरे श्रीमती शारदा तायडे, व अरविंद भाऊ लोड यांनी अथक प्रयत्न केले. यावेळी पालकांची ही सुद्धा उपस्थिती होती



إرسال تعليق