खामगाव नांदुरा रोडवर ट्रकची दुचाकीला धडक: दुचाकी स्वराचा जागीच मृत्यू
ओम साई फाउंडेशन रुग्णवाहिका स्वयंसेवक विलास निबोळकर आश्विन फेरण कृष्णा वसोकार यांची तात्काळ मदत
जनोपचार नेटवर्क खामगाव : दि.31/1/2025 रोजी सायंकाळी 6 वाजेच्या दरम्यान खामगाव नांदुरा रोडवरील आमसरी नजीक मोटरसायकल व ट्रकचा भीषण अपघात होऊन मोटरसायकलस्वार जागेवरच ठार झाला. मृतकाचे नाव योगेश प्रकाश सातव व अंदाजे 40 राहणार पिंपळगाव नाथ तालुका खामगाव असे समोर आले असून मोटर सायकल क्रमांक MH 28 AH 5383 असा आहे.मोटरसायकलचा अपघात अशी माहिती जलम पोलीस स्टेशनचे सचिन बावणे यांनी ओम साई फाउंडेशन ला दिली असता घटनास्थळी मदत कार्यासाठी ओम साई फाउंडेशन रुग्णवाहिका स्वयंसेवक विलास निबोळकर आश्विन फेरण कृष्णा वसोकार घटनास्थळी दाखल सदर मोटरसायकल ट्रक क्रमांक GJ 31 T 3647मध्ये अडकून पडलेली आहे

Post a Comment