ॲड. अमोल अंधारे शिवसेनेत....  राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला सन्मान 

ॲड. अमोल अशोकराव अंधारे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे आगामी जिल्हा परिषद,पंचायत समिती व ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या संघटनात्मक बळात मोठी वाढ होणार असल्याचे राजकीय जाणकारांकडून बोलले जात आहे.

अकोला जनोपचार न्यूज नेटवर्क:- अकोला येथे आज आयोजित भव्य जाहीर सभेत  राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या हस्ते, केंद्रीय मंत्री ना. प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनात व प्रमुख उपस्थितीत, आमदार संजू भाऊ गायकवाड यांच्या नेतृत्वात हिंदुत्ववादी विचारांचे प्रभावी नेतृत्व ॲड. अमोल अशोकराव अंधारे यांनी हजारो शिवसैनिकांचा साक्षीने शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

या पक्षप्रवेश सोहळ्यास खामगाव विधानसभा मतदारसंघाचे पक्ष निरीक्षक आमदार संजय रायमुलकर,. शशिकांत खेडेकर तालुका प्रमुख राजू बघे यांच्यासह तालुक्यातील  समर्थक तसेच  पदाधिकारी, शिवसैनिक व हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजराजेश्वर नगरीत झालेल्या या जाहीर प्रवेशामुळे संपूर्ण खामगाव परिसरातील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे

 खामगाव तालुक्यातील व घाटाखालील संपूर्ण परिसरात हिंदुत्ववादी ५१०० कार्यकर्त्यांच्या शिवसेना प्रवेशाकरिता खामगाव येथे भव्य जाहीर सभा देण्यात यावी, अशी मागणी याप्रसंगी  निवेदनाद्वारे केली.यावेळी एकनाथ शिंदे यांनी ॲड. अमोल अंधारे यांच्या पाठीवर आशिर्वादरूपी हात ठेवत “नक्की लवकरच येतो कामाला लागा”असे आश्वास्थ केले.


Post a Comment

Previous Post Next Post