"बस झाले हार तुरे ,आता इकडेही लक्ष द्या थोडे"....!
खामगाव मोकाट कुत्र्यांचा त्रास वाढला: बंदोबस्ताची गरज
जनोपचार न्यूज नेटवर्क खामगाव: - खामगाव शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या शिगेला पोचली असून पालिका प्रशासनाने आता याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
गेल्या काही महिन्यांपासून शहरातील वेगवेगळ्या भागात कुत्र्यांचा झुंड पहावयास मिळत आहे. रात्रीच्या वेळी किंवा सुसाट गाड्यांच्या मागे धावणाऱ्या कुत्र्यांमुळे अनेक समस्या निर्माण होऊ लागले आहे. बऱ्याचदा कुत्रे मागे लागल्यामुळे दुचाकी वरील नियंत्रण सुटून अपघातही घडले आहेत. स्थानिक बस स्टॅन्ड चौकात, ओंकारेश्वर स्मशानभूमी जवळ मोठ्या प्रमाणात मोकाट कुत्र्यांचा झुंड पहावयास मिळतो. लहान मुले व महिलांना यापासून मोठा धोका निर्माण झाला असून नगरपालिका प्रशासनाने आता या समस्येकडे लक्ष देऊन मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मोठी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Post a Comment