जिजाऊ सावित्रीबाई महिला उत्सव मंडळाच्या वतीने मूकबधिर विद्यालय भोजन वाटप
जनोपचार न्यूज नेटवर्क खामगाव :- जिजाऊ सावित्रीबाई महिला उत्सव मंडळाच्या वतीने ७ जानेवारी मूक बधीर विद्यालय मध्ये जयंती साजरी करण्यात आली . सर्व प्रथम राजमाता जिजाऊ क्रांतिज्योती सावित्री बाई फुले यांच्या प्रतिमांना हार अर्पण करण्यात आले.बाळापूर मॅडम गवांदे मॅडम पदमाने ताई इत्यादी महिला यांची भाषणे झाली .आणि मूक बधिर विद्यालय मधील सर्व शिक्षक व कर्मचारी रुंद यांनी मोलाचे सहकार्य केले.
पद्मने मॅडम यांनी संस्थेचे आभार मानले. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मूकबधिर मुलांना भोजनदान तसेच एक क्विंटल धान्य देण्यात आले. जिजाऊ सावित्री महिला मंडळाच्या महिला हजर होत्या. यावेळी करुणाताई गवई ,कमला चांदूरकर ,अरुणा भारसाकडे ,प्रीती सपकाळ, रेखा निंबोकार, जया गवई, व पोटरे ताई, इतर सर्व महिला हजर होत्या यावेळी गव्हादे सर आणि निंबोकार सर यांनी आभार प्रदर्शन केले. महिला मंडळाच्या अध्यक्षा भाग्यश्री ताई हिवराळे उपाध्यक्ष पद्माने ताईयांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात आला.


Post a Comment