कौशिक च्या कौशल्याचे एसडीओंनी केले कौतुक...!
कौतिक टून ललाईट चा प्रजासत्ताक दिनी सत्कार
जनोपचार न्यूज नेटवर्क खामगाव : जिथे समुद्रात काय ठेवायला माणूस घाबरतो त्या समुद्रात पाच किलोमीटर पोहण्याचे कौशल्य मूकबधिर विद्यार्थ्यांनी दाखवले. या विद्यार्थ्याचे धाडस पाऊल अनेकांनी कौतुकाची व हिमतीची थाप या विद्यार्थ्याच्या पाठीवर दिली. स्थानिक एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित निवासी मूकबधिर विद्यालय खामगाव येथील विद्यार्थी कौशिक प्रेम टूनलाईट ह्याने सागर (समुद्र)जलतरण स्पर्धेमध्ये पाच किलोमीटर यशस्वीरिता पूर्ण केल्याबद्दल त्याचे आज प्रजासत्ताक दिनी उपविभागीय अधिकारी डॉ. रामेश्वर पुरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष सौ अपर्णा फुंडकर, माजी आमदार नानाभाऊ कोकरे माजी आमदार सानंदा यांच्यासह राजकीय नेते अधिकारी व विद्यार्थी उपस्थित होते.

إرسال تعليق