गुजरात येथे होणाऱ्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी कौशिक प्रेम टूनलाईट महाराष्ट्र संघात
जनोपचार न्यूज नेटवर्क खामगाव :- गुजरात येथे होणाऱ्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धौ 2025-26 मध्ये कौशिक प्रेम टूनलाईट याची महाराष्ट्र संघामध्ये निवड झाली आहे. महाराष्ट्र स्पोर्ट्स कौन्सिल ऑफ द डेफ, या संघटने द्वारे अकोला येथे आयोजित केलेली १५ राज्यस्तरीय सीनियर आणि ज्युनियर अथलेटिक्स आणि स्विमिंग या विविध खेळ स्पर्धांमध्ये महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्याने सहभाग नोंदविला होता. त्यामध्ये जलतरण swimming मध्ये 50 मीटर व 100 मीटर Breast stroke या प्रकारामध्ये मूकबधिर निवासी विद्यालय खामगाव, जिल्हा बुलढाणा येथील विद्यार्थी कौशिक प्रेम टूनलाईट याने तृतीय व द्वितीय क्रमांक सह सिल्वर व ब्रांझ मेडल मिळविले आहे.
बुलढाणा जिल्हा मूक बधिर असोसिएशन व क्रीडा मंडळ बुलढाणा, सहसचिव धनेश नेमाडे यांनी अथक परिश्रम घेऊन सदर खेळाडूंचे मनोधैर्य वाढविण्यासाठी तसेच खेळामध्ये भाग घेण्यास संदर्भात सर्वतोपरी प्रयत्न केले. गुजरात अहमदाबाद येथे राष्ट्रीय खेळामध्ये सहभाग घेण्यासाठी सदर खेळाडूंची निवड ही महाराष्ट्र संघात झालेली असून सदर निवडीबद्दल बुलढाणा जिल्हा मूकबधिर असोसिएशनचे सहसचिव धनेश नेमाडे, यांनी सदर खेळाडूचे व त्यांच्या पालकाचे अभिनंदन केले आहे.

إرسال تعليق