ऑल इंडिया अँटी करप्शन कमिटीच्या जिल्हाध्यक्षपदी पत्रकार महेश देशमुख

  जनोपचार न्यूज नेटवर्क खामगाव - ऑल इंडिया अँटी करप्शन कमिटीच्या बुलढाणा जिल्हाध्यक्षपदी येथील उद्योजक तसेच सांज. खामगाव फास्ट चे संपादक महेश बाळासाहेब देशमुख यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.

 ऑल इंडिया अँटीकरप्शन कमिटी दिल्ली चे राष्ट्रीय सचिव तसेच महाराष्ट्र अध्यक्ष राजेश डोंगरकर यांनी 28 जानेवारी 2026 रोजी अकोला येथे आयोजित कार्यक्रमात पत्रकार तसेच खामगाव फास्ट चे संपादक महेश बाळासाहेब देशमुख यांची बुलढाणा जिल्हाध्यक्ष पदाचे नियुक्तीपत्र देऊन नियुक्ती करण्यात आली आहे. ऑल इंडिया अँटी करप्शन कमिटी Govt. of NCT, Delhi (Regd. No S/00791 NE 2012) नीती आयोग युनिक आयडी DL 2017/203434 ही भारत सरकारची अधिकृत संस्था असून भ्रष्टाचारावर नियंत्रण मिळवण्यासाठी भारत सरकार व नीती आयोगाद्वारे या समितीची स्थापना करण्यात आली आहे. यावेळी ऑल इंडिया अँटीकरप्शन कमिटीचे राजेश डोंगरकर यांचे सह पदाधिकारी तसेच मान्यवर उपस्थित होते. अशी माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली आहे.

Post a Comment

أحدث أقدم