लायन्स एक्स्पो 2026 मध्ये विविध स्पर्धांचे आयोजन :आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी

जनोपचार न्यूज नेटवर्क खामगाव - लायन्स क्लब खामगाव च्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिनांक 12फेब्रुवारी ते 17 फेब्रुवारी दरम्यान गवर्नमेंट पॉलिटेक्निक ग्राऊंडवर भव्य लायन्स एक्स्पो चे आयोजन करण्यात आले आहे .

या एक्स्पो मध्ये भव्य व्यापार, व्यंजन ,कृषी व मनोरंजन प्रदर्शनी चे आयोजन केले आहे .यावर्षीच्या एक्स्पो चे खास आकर्षण म्हणजे रॉयल गोल्ड सर्कस च्या लाईव्ह शो चे आयोजन गुरुवार , 12फेब्रुवारी पासून सुरू होत असलेल्या या एक्स्पो मध्ये रोज सायंकाळी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे 

12  फेब्रुवारी  गुरुवारी  हस्ताक्षर स्पर्धा विविध गटामध्ये,13 फेब्रुवारी शुक्रवारी हेयर स्टाईल स्पर्धा,गायन स्पर्धा व वाद्य वादन स्पर्धा असेल.14 फेब्रुवारी शनिवारी एक्स्पो चित्रकला स्पर्धा , डुएट जोडी नं 1डान्स , ग्रुप व सोलो डान्स अर्थात समूह व एकल नृत्य स्पर्धा असेल.रविवार 15 फेब्रु रोजी सोलो डान्स एकल नृत्य स्पर्धा,सोमवारी 16 फेब्रु रोजी सोलो गायन आणि म्युझिकल इन्स्ट्रुमेंट वादन स्पर्धा असेल तर एक्स्पो च्या अंतिम दिवशी मंगळवारी १७ फेब्रु रोजी बेस्ट आऊट ऑफ वेस्ट  व स्टँड अप कॉमेडी स्पर्धा राहील 

वरील सर्व स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी डॉ अपर्णा बावस्कर  9423144987, फाल्गुनी शाह 8605785516,  नेहा कमानी 9665367179, रितू बडजाते 9850959227, दीपिका परदेशी 7972007072, नम्रता लाठे 9834874692,डॉ उज्वला पवार 7709020631,  लि पराग खराटे 9359335862, लिओ पंकज घ्यार 7719892825, लिओ मयूर सोनोने 9766778937 , लिओ सागर देशमुख 9518936006, लिओ प्रथमेश पाटील 9579174753  यांच्याशी संपर्क साधावा व आपापल्या गटात नोंदणी करून घ्यावी.

१२ ते १७ फेब्रुवारी दरम्यान होत असलेल्या या लायन्स एक्स्पो तील विविध स्पर्धांमध्ये जास्तीत जास्त स्पर्धकांनी भाग घ्यावा असे आवाहन आयोजकांचे वतीने करण्यात येत आहे अशी माहिती प्रसिद्धी प्रमुख डॉ परमेश्वर चव्हाण,श्रमिक जैस्वाल व विजय मोरखाडे  यांनी केले आहे

Post a Comment

أحدث أقدم