चोऱ्यांचे भीती:अमृतनगर व वाडी येथील शिक्षण केंद्र रस्त्यावरील लाईट व cctv ची व्यवस्था करा - नगराध्यक्षांना निवेदन


जनोपचार न्यूज नेटवर्क खामगाव - अमृतनगर व वाडी येथील शिक्षण केंद्र रस्त्यावरील लाईट व cctv ची व्यवस्था करणेबाबत आज  ग्रामस्थ वाडी, दिपालीनगर व अमृतनगरयेथील नागरिकांनी नगराध्यक्षांना निवेदन दिले.

यावेळी श्रध्दा धोरण ,मालती मानकर ,सरिता मिरगे, सिमा पाटील, अश्विनी संत,दिलीपबापू देशमुख ,मुंडोकर ताई यांच्या सह नागरिकांनी उपस्थिती होती.निवेदनात नमूद आहे की, उपरोक्त विषयी विनंती की वाडी, दिपालीनगर व अमृतनगर भागामध्ये चोरीचे खूप प्रमाण वाढले आहे, असा एकही महिना जात नाही की चोरी होत नाही. येथील ग्रामस्थ आपला जीव मुठील घेवून जीवन जगत आहेत. या चोरांना कोणाचीही भीती राहिलेली नाही. या परिसरामध्ये 1.1.1., Polytechnic, G.S. College व मुलींचे शासकीय वसतिगृह आहेत. त्यामधील खूप विद्यार्थी जलंब रोड परिसरात राहतात, रात्री बेरात्री या परिसरात वाहनांची वर्दळ असते कोणतेही अनुचित घटना घडू नये म्हणून येथील सर्व रस्त्यावर LED फोकस व cctv कॅमेरे लावण्यात यावे अशी येथील सर्व नागरिकांची मागणी आहे.कृपया नागरिकांच्या विनंतीस मान देवून वरील प्रमाणे व्यवस्था लवकरात लवकर करावी ही नम्र विनंती.जेणेकरुन येथील चोरांना आळा बसेल व नागरिकांच्या मनातील भीती कमी होईल.

Post a Comment

أحدث أقدم