खामगावात स्वराज्य फाउंडेशनतर्फे 'लाठी-काठी' प्रशिक्षण शिबिर
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त विशेष उपक्रम
जनोपचार न्यूज खामगाव :छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने पावन झालेल्या या भूमीत, त्यांनी ज्या युद्धकलेच्या जोरावर स्वराज्य निर्माण केले, त्या प्राचीन मराठा युद्धकलेचा वारसा जपण्यासाठी खामगाव येथे एका विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. स्वराज्य फाउंडेशन, खामगाव यांच्या वतीने दिनांक १९ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत भव्य लाठी-काठी प्रशिक्षण शिबीर' आयोजित करण्यात आले आहे.आजच्या काळात महिला व मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असताना, त्यांना स्वसंरक्षणाचे धडे मिळावेत हा या शिबिराचा मुख्य उद्देश आहे. महाराष्ट्राची संस्कृती टिकवून ठेवण्यासोबतच,मुली आणि महिलांना आत्मरक्षणासाठी सक्षम करण्यासाठी या शिबिरात लाठी-काठीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.१९ फेब्रुवारी ते १ मार्च २०२६सकाळी ६:३० ते ८:३० पर्यंत खामगाव जिल्हा परिषद शाळा (मुली) मैदान,कोर्टाजवळ, खामगाव.शिबिर असणार आहे.१२ वर्षांवरील सर्व मुला-मुलींसाठी व महिलांसाठी प्रवेश शुल्क फक्त १०० रुपये ठेवण्यात आले आहे.या ऐतिहासिक युद्धकलेचा वारसा अनुभवण्यासाठी आणि प्रशिक्षणासाठी इच्छुकांनी आपली नाव नोंदणी खालील क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन आयोजक स्वराज्य फाउंडेशन यांच्या वतीने करण्यात आले आहे.कु. श्रुती खंडारे: ९३५९९४८१६९ गौरव भालेराव: ७६२०९६९२३० आपली संस्कृती आणि आपले संरक्षण!" या ध्येयाने प्रेरित होऊन खामगावातील नागरिकांनी आणि विशेषतः पालकांनी आपल्या पाल्यांना या शिबिरात सहभागी करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment