आजी-माजी सैनिक कल्याणकारी बहुउद्देशीय संघटना सभा संपन्न
जनोपचार न्यूज नेटवर्क खामगाव:- आजी माझी सैनिक कल्याणकारी बहुउद्देशीय संघटनेची सभादिनांक दि १४ फेब्रुवारी रोजी संघटनेच्या कार्यालयात संपन्न झाली. यावेळी विविध विषयावर चर्चा होऊन संघटन मजबूत करण्यासाठी चर्चा करण्यात आली.
सर्वप्रथम पहेलगाव येथील शहीद सैनिकांना श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष रामराव देशमुख होते. सैनिकांच्या समस्या बाबत चर्चा करण्यात आली. सभेमध्ये सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.सभे मध्ये जगन्नाथ कळसकार (उपाध्यक्ष), दिलीप भाऊ मोरे (प्रमुख सल्लागार),प्रभाकर रावजी बुराडे,यादव वडतकर,सूर्यकांत सोनटक्के उपस्थित होते सैनिकांच्या समस्या व सजेशन याबाबत सैनिक स्मारक साठी जागा व माजी सैनिकाचे नगरपरिषद टॅक्स बद्दल निवेदन तयार करणे, सर्वांना आपापल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले आणि सर्वांच्या अडीअडचणी विचारून सोडवण्यात आल्या.आजी माजी सैनिक कल्याणकारी बहुउद्देशीय संघटना चे कार्य पुढे नेण्यासाठी एकजुटीने राहण्याचे आश्वासन दिले. सैनिक भवन व सैनिक स्मारक उभारण्याचा सर्वांमध्ये निर्णय घेण्यात आला.

Post a Comment