उद्या ‘गीता ज्ञानाच्याव्दारे सनातन संस्कृतीची रक्षा’ विषयावर  आखाडा सहारनपूरचे आचार्य कमल किशोर महाराजांचे प्रवचन

जनोपचार न्यूज नेटवर्क खामगाव :  प्रजापीता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय खामगावच्यावतीने शुक्रवारी २० फेब्रुवारीला सकाळी १० वाजता स्थानिक रायगड कॉलनी स्थित महाराष्ट्र ब्राह्मण सभा मंगल कार्यालय येथे 'गीता ज्ञान द्वारा सनातन संस्कृती की रक्षा' या विषयावर उत्तर प्रदेश राज्यातील सहारनपूर येथील दिव्यशक्ती आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर परम तत्ववेत्ता संत श्री कमलकिशोरजी महाराज यांचे प्रवचन आयोजित केले आहे. कार्यकर्माच्या अध्यक्षस्थानी अकोला, वाशीम

ब्रह्माकुमारीज प्रमुख राजयोगिनी ब्रह्माकुमारी रुख्मिणीदिदी तर प्रमुख अतिथी ब्रह्माकुमारीज धार्मिक विंग संयोजक राजयोगी ब्रह्माकुमार नारायण भाईजी, हभप गजाननदादा महाराज शास्त्री जालना, हभप वासुदेव महाराज शास्त्री वाघजाळफाटा आश्रम, हभप किसन महाराज सुपेकर घाटपुरी, आचार्य हरिभाऊ वेरूळकर गुरुजी संचालक श्री गुरुदेव सेवाश्रम नांदुरा, गणेश शर्मा महाराज खामगाव, खामगाव ब्रह्माकुमारीज संचालिका ब्रह्माकुमारी शकुंतलादिदी इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सनातन संस्कृतीची ओळख नवीन पिढीला असेल तरच भारतीय संस्कृतीची जोपासना आणि संवर्धन करून धार्मिक मूल्य आणि धमिक संस्कार असलेला समाज तयार होईल. अन्यथा धर्माची हानी आणि ग्लानी निश्चित होईल.

साक्षात ईश्वराने दिलेल्या गीता ज्ञानामुळे सनातन संस्कृतीची रक्षा शक्य आहे. त्यासाठी यथार्थ ज्ञान समजणे गरजेचे आहे. या प्रवचनाचा लाभ घेण्याचे आवाहन संचालिका शकुंतला दिदीसह ब्रह्माकुमारीज परिवाराच्यावतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

أحدث أقدم