प्रति,

मा. ना. प्रतापरावजी जाधव साहेब,

खासदार तथा केंद्रीय मंत्री, भारत सरकार,कार्यालय बुलढाणा

अर्जदार : संपादक, जगदीश रतनलाल अग्रवाल ज्येष्ठ पत्रकार - महाराष्ट्र शासन अधिस्विकृतीधारक रा. अग्रवाल हॉस्पिटल कंपाऊंड, गोकुलनगर, खामगांव जि. बुलढाणा मो.नं. 9422927070

विषय १) नगर परिषद कडुन लागणारा मालमत्ता कर हा हॉस्पिटलकरिता " अत्यावश्यक जन सेवा " (Public Service) म्हणून घरगुती वापरापेक्षा कर कमी व्हावा

२) खामगांव नगर परिषदेने मालमत्ता करात केलेली नियमबाह्य आणि जुलमी वाढ रद्द करणे बाबत

मा. महोदय,

१) गेल्या काही वर्षात खामगांव शहरात विविध क्षेत्रात तज्ञ असलेले डॉक्टर्स आले असून ते रात्रंदिवस रुग्णांना सेवा देत आहेत. खामगांव शहरातील नागरीकांना याचा खुप लाभ होत आहे.बँकेचे कर्ज काढून काही डॉक्टर्स जागा विकत घेऊन त्यावर आपले हॉस्पीटल बांधत आहेत. हॉस्पिटल ला लागणारे विविध परवान्याचा खर्च, हॉस्पिटलचा खर्च, कर्जाचे व्याजाचा हप्ता, आदी दिल्यानंतर नगर परिषद हॉस्पिटलला भरमसाठ असा वाणिज्य वापराचा जास्तीचा मालमत्ता कर लावत आहे. यामुळे डॉक्टर्स लोकाना हॉस्पिटल चालवणे कठीण झाले आहे.तरी हॉस्पिटलला वाणिज्य वापराचा कर न लावता अत्यावश्यक जनसेवा (Public Service) घरगुती वापरापेक्षा कमी असलेला मालमत्ता कर लावण्याचे निर्देश न.पा. ला द्यावे. महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी सुध्दा हॉस्पिटल करीता (Public Service) म्हणून कमी दर आकारत असते.

२) खामगांव नगर परिषदेने मालमत्ता करात नियमबाहय आणि जुलमी वाढ करुन नागरीकाना नोटीस पाठविल्या आहेत त्या रद्द करण्यात याव्या.आपण डॉक्टर्स मंडळीचे आणि खामगांवच्या जनतेचे पालक आहात, या नात्याने वरील दोन्ही रास्त बाबींचा सहानुभुतीपूर्वक विचार करुन तसे निर्देश संबंधीत वरिष्ठ अधिकाऱ्यांना द्यावे ही नम्र विनंती.



                                           (जगदीश अग्रवाल)

Post a Comment

Previous Post Next Post