कुकर्मी मुख्याध्यापकाला न्यायालयाचा दणका: सहा अल्पवयीन विद्यार्थिनींवर केला होता अत्याचार

जनोपचार न्यूज नेटवर्क हिंगोली : एक दोन नव्हे तर सहा अल्पवयीन विद्यार्थिनींवर अत्याचार करणाऱ्या कुकर्मी तत्कालीन मुख्याध्यापकाला न्यायालयाने चांगलाच दणका दिला असून पिढी त्यांना न्याय दिला आहे. येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती सरोज माने - गाडेकर यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. या निकालामुळे गुन्हेगारी तसेच कुप्रवृत्तीवर नक्कीच आळा बसणार आहे. सदर अत्याचार प्रकरणी तत्कालीन मुख्याध्यापकास ०३ गुन्ह्यात  ०५ वर्ष सश्रम कारावासाची व ७५०००/- रूपये दंडाची शिक्षा ठोठावली.

याबाबत पार्श्वभूमी अशी की , जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तोंडापूर ता. कळमनुरी, जि. हिंगोली येथील एकूण ०६ मुली व ०३ मुले हे नवोदय तसेच स्कॉलरशिप या परिक्षेची तयारी करत होते. त्यादरम्यान उन्हाळी सुट्टीमध्ये शाळेचे तत्कालीन मुख्याध्यापक आरोपीन नामे भगवान पंडीतराव अवचार, हे शाळेमध्ये सदरच्या विद्यार्थ्यांचे क्लास घ्यायचे त्यावेळी एकेका मुलीस वैयक्तीकरित्या स्टोअर रूममध्ये बोलावून त्यांचेसोबत अश्लिल कृत्य करत असत. अशा आशयाची फिर्यादीवरून पोलीस स्टेशन आखाडा बाळापूर येथे कलम ३५४,५०६ भा.दं.वि., कलम ९ (एफ), १०.११,१२ पोक्सो व अ.जा.ज.अ.प्र. कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला.


सदर प्रकरणी तपासी अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.यतिष देशमुख, श्री. विवेकानंद वाखारे, श्री. किशोर कांबळे तसेच, सहायक पोलीस निरीक्षक श्री बोधनापोड, श्री. शिवाजी बोंडले, यांनी सखोल तपास करून दोषारोपपत्र जिल्हा न्यायालय हिंगोली येथे अनुकमे विशेष खटला कमांक ४८/२०२२, विशेष खटला कमांक ९४/२०२२, विशेष खटला कमांक १०२/२०२२, अन्वये दाखल करण्यात आले होते.


आज दिनांक २३ फेब्रुवारी रोजी जिल्हा न्यायाधीश श्रीमती एस.एन. माने गाडेकर यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तोंडापूर येथील तत्कालीन मुख्याध्यापक आरोपी नामे भगवान पंडीतराव अवचार, वय ५६ वर्षे, रा.श्रीराम नगर, हनुमानगड, नांदेड यास दोषी ठरवत कलम ३५४ भादंवि मध्ये "०५ वर्ष सश्रम कारावास" तसेच रू.२५,०००/- दंड (दंड न भरल्यास ०१ वर्षे सश्रम कारावास), कलम ५०६ भादवि मध्ये "०१ वर्ष सश्रम कारावास" तसेच रू.१०,०००/- दंड (दंड न भरल्यास ०६ महिने सश्रम कारावास), कलम ०९ (एफ) पोक्सो मध्ये "०५ वर्ष सश्रम कारावास" तसेच रू. २५,०००/- दंड (दंड न भरल्यास ०१ वर्षे सश्रम कारावास), कलम ११ पोक्सो मध्ये "०३ वर्ष सश्रम कारावास" तसेच रू.१५,०००/- दंड (दंड न भरल्यास ०८ महिने सश्रम कारावास) अशाप्रकारे एकूण तिन्ही प्रकरणामध्ये शिक्षा दिली. सर्व शिक्षा एकत्र भोगण्याचा आदेश दिला. तसेच सदर प्रकरणातील पिडीत मुलींना सरकारी योजनेअंतर्गत रू.२५,०००/- रक्कम ही आर्थिक मदत म्हणून देण्याचे आदेश दिले.

वरील तिन्ही प्रकरणात सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील श्री. एन. एस मुटकुळे यांनी साक्षीदार तपासले तसेच अंतिम युक्तीवाद सादर केला. त्यामध्ये पिडीत मुलींची साक्ष, तपासीक अंमलदार तसेच जि.प.प्रा.शाळा तोंडापूरचे मुख्याध्यापक श्री. पिराजी खिल्लारी यांची साक्ष महत्वाची ठरली. सदर प्रकरणी सहायक सरकारी वकील श्री.एस.टी. कुटे व सहायक सरकारी वकील श्रीमती सविता एस. देशमुख (जाधव) यांनीही सहकार्य केले. तसेब कोर्ट पैरवी श्रीमती सुनिता धनवे (१८९), पो.स्टे.आ.बाळापूर, यांनी सहकार्य केले.

Post a Comment

Previous Post Next Post