अखेर खामगाव पोलिसांनी लावला ४ मोबाईलचा शोध

मोबाईल हरवलेल्या व्यक्तींना पुन्हा मिळाले आपले मोबाईल


जनोपचार न्यूज नेटवर्क खामगाव - ठाणेदार रामकृष्ण पवार यांनी आतापर्यंत अनेक गुन्हे ओळखीस आणले आहेत. त्यात आता पथकाच्या मदतीने हरवलेल्या चार मोबाईलचा देखील शोध घेतला असून हे मोबाईल मूळ मालकांना देण्यात आले. त्यामुळे हरवलेला मोबाईल परत मिळालेल्याचा आनंद मूळ मालकांनी व्यक्त केला.

पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशानुसार पोलीस स्टेशन खामगाव शहर हद्दीतील नागरिकांचे हरवलेले मोबाईल फोन शोधून काढण्याची विशेष मोहीम राबविण्यात आली.

सदर मोहिमेदरम्यान तांत्रिक विश्लेषण व सायबर सहाय्याच्या माध्यमातून नागरिकांचे हरवलेले मोबाईल फोन यशस्वीरीत्या शोधून काढण्यात आले. शोध लागलेले मोबाईल संबंधित नागरिकांना पोलीस स्टेशन खामगाव शहर येथे बोलावून योग्य पडताळणी करून आदित्य कुमार सिंह (भा.पो.से) यांचे हस्ते परत करण्यात आले.

हरवलेले मोबाईल पुन्हा मिळाल्याने नागरिकांनी पोलीस प्रशासनाचे आभार मानले असून पोलीस दलाविषयी विश्वास अधिक दृढ झाला आहे. 

सदर कामगिरी पोलीस अधीक्षक निलेश तांबे साहेब, अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, प्रदीप पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी खामगाव यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक आर एन पवार व पोलीस स्टेशन खामगाव शहर येथील अधिकारी व अंमलदार यांच्या संयुक्त प्रयत्नातून पार पडली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post