राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंती साजरी
जनोपचार न्यूज नेटवर्क खामगाव) स्थानिक यशोधरा नगर या ठिकाणी राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची जयंती गाडगेबाबा चौक सावित्रीबाई फुले मार्ग या ठिकाणी साजरी करण्यात आली. सर्वप्रथम आर. एन. वानखडे (माजी प्राचार्य) यांच्या हस्ते प्रतिमेला हार अर्पण करण्यात आला. त्यानंतर गाडगे महाराज यांचे जीवन आणि कार्य याविषयी प्रा. जी.आर. तायडेसर,अंकुश गवई यांनी आपले विचार व्यक्त केले. हा संपूर्ण कार्यक्रम हिरामण इंगळे आणि अंकुश गवई यांनी आयोजित केलेला होता.
या कार्यक्रमाला पीएसआय राधा इलमकर मॅडम ग्रामीण पोलीस स्टेशन खामगाव या सुद्धा उपस्थित होत्या. गाडगेबाबा स्वच्छतेचे पाईक होते, म्हणून सर्वांनी रस्ता झाडून त्यांना अभिवादन केले. या कार्यक्रमाला अंकुश गवई,हिरामण इंगळे,आर. एन. वानखडे, श्याम सावदेकर लक्ष्मण वानखडे,प्राध्यापक जी. आर. तायडे घुटके पाटील, देविदास निंबोकार ईलमकर मॅडम, अतुल इंगळे पोलीस, वीरेंद्र चव्हाण, भाऊराव पोहरे, रुपेश गावस्कर, श्रीकृष्ण पाटील,श्याम सावदेकर सौ आशा वानखडे, सौ अलकाताई चव्हाण श्रीमती लोखंडे,इत्यादी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन जीआर तायडे सर यांनी केले आणि आभार प्रदर्शन अंकुश गवई यांनी केले.


إرسال تعليق