गणेशभाऊ चौकसे यांच्या पुढाकारातून.....

 खामगावातील लाडक्या बहिणीसाठी ऑनलाईन केवायसी सुविधा 

जनोपचार न्यूज नेटवर्क खामगाव:- E Kyc केल्यानंतर अनेक लाडक्या बहिणींचे पैसे बंद झाले होते. त्यानंतर संपूर्ण राज्यात गोंधळ निर्माण झाला होता. दरम्यान राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष गणेश भाऊ चौकसे यांनी हिरमोड झालेल्या बहिणींसाठी मोठा मोर्चा काढून सर्वप्रथम आवाज उठविला.ही ओरड शासनाच्या दफ्तरी गुंजल्यामुळे पुन्हा E Kyc करण्यासाठी सरकारने वेबसाइड सुरू करून दिली आहे.

लाडक्या बहिणींना सुविधा उपलब्ध व्हावी या उद्देशाने गणेश भाऊ चौकसे यांचे आठवडी बाजारातील ऑफिसवर उद्या ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता ऑनलाईन E Kyc करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात व आली आहे.ज्यांच्या E Kyc मध्ये तृटी आहे त्यांनी आधार कार्ड व आधारलिंक असलेला मोबाईल सोबत आणावा.या साठी नाममात्र ५० रु शुल्क आकारण्यात आला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post