लाडक्या बहिणींना पुन्हा संधी
इ केवायसी आता पुन्हा करू शकता
मुंबई: 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेचा लाभघेणाऱ्या महिलांसाठी राज्य सरकारने एक मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. ज्या महिलांनी e-KYC प्रक्रिया पूर्ण करताना तांत्रिक किंवा नजरचुकीने माहिती भरण्यात चूक केली होती, त्यांना आता आपल्या अर्जात सुधारणा करण्याची पुन्हा एक संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. उल्लेखनीय म्हणजे ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष गणेश भाऊ चौकसे यांनी गेल्या आठवड्यात बुलढाणा येथे लाडक्या बहिणींचा मोठा मोर्चा काढून आवाज उठवला होता.
नेमकी चूक काय झाली होती? योजनेंतर्गत ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अनेक महिलांनी e-KYC पूर्ण केले. मात्र, कुटुंबातील सदस्यांच्या सरकारी नोकरी किंवा निवृत्तीवेतनाबाबतचा (Pension) पर्याय निवडताना अनेक लाभार्थ्यांकडून चुकीची माहिती भरली गेली. यामुळे पात्र असूनही अनेक महिलांचे अर्ज अपात्रतेच्या धोक्यात आले होते. जिल्हाधिकारी स्तरावर याची प्रत्यक्ष पडताळणी सुरू असली, तरी प्रक्रियेला देण्यासाठी आता ऑनलाईन दुरुस्तीची सुविधा आली आहे.

Post a Comment