ज्येष्ठ संपादक डॉ. राजेश राजोरे यांचा प्रसिध्द साहित्यिक फ. मू. शिंदे यांच्याहस्ते सत्कार
खामगावः येथील सहकार महर्षी स्व. भास्करराव शिंगणे महाविद्यालय येथे राज्यस्तरीय वैखारी पुरस्कार वितरण समारंभात ज्येष्ठ संपादक डॉ. राजेश राजोरे यांचा पत्रकारितेत पीएच. डी. प्राप्त केल्याबद्दल प्रसिध्द साहित्यिक फ. मू. शिंदे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस, डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, डॉ. सद्गुण देशमुख, प्रा. डॉ. सदानंद देशमुख, डॉ. रंगनाथ पठारे, प्रा. निलिमा देशमुख मंचावर उपस्थित होते.

Post a Comment