लॉयन्स एक्स्पो २०२६ उत्साहात संपन्न
जनोपचार न्यूज नेटवर्क खामगाव :- विश्वव्यापी सर्वोत्तम सेवाभावी संस्था लॉयन्स क्लब इंटरनॅशनल अंतर्गत स्थानिक शाखा लॉयन्स क्लब खामगांव व्दारा दरवर्षी भव्य व्यापार, कृषी, व्यंजन व मनोरंजन प्रदर्शनी लॉयन्स एक्स्यो चे आयोजन करण्यात येते. लॉयन्स क्लब खामगांवच्या या सुवर्ण महोत्सवी वर्षी १३ व्या लॉयन्स एक्स्पो २०२६ चे आयोजन स्थानिक पॉलीटेक्नीक कॉलेजचे मैदान, जलंब रोड खामगांव येथे दि. १२ फेब्रुवारी ते १७ फेब्रुवारी २०२६ दरम्यान आयोजन करण्यात आले होते.
या लॉयन्स एक्स्यो चे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री मा. ना. अॅड.श्री. आकाशदादा फुंडकर यांचे शुभहस्ते गुरुवार दि. १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी अत्यंत उत्साहात संपन्न झाले. दि. १२ फेब्रुवारी पासून दररोज शालेय विद्यार्थ्यांसाठी व महाविद्यालयीन युवक-युवर्तीसाठी आपल्या कलागुणांचे सादरीकरण करण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये खामगांवकर नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देत विविध बक्षिसांची लयलूट केली. सदर लॉयन्स एक्स्पो २०२६ मध्ये स्थानिक व राज्यभरातील इतर व्यावसायिकांनी आपल्या उत्पादनाच्या प्रदर्शन व विक्रीसाठी सुमारे ८३ कमर्शियल स्टॉल्सचे माध्यमातून सहभाग नोंदविला. संपूर्ण कुटुंबासह बालगोपालांना मनोरंजनासाठी सर्व सुविधायुक्त अॅम्युझमेंट झोनचा लाभ सर्वांनी घेतला. चविष्ठ व दर्जेदार खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सचा सर्व खामगांवकर नागरिकांनी मनमुराद आस्वाद घेतला. या लॉयन्स एक्स्पो २०२६ ला सुमारे ४५ हजार नागरिकांनी भेट देऊन आनंद अनुभवला.
लॉयन्स एक्स्पो २०२६ चा समारोप समारंभ मंगळवार दि. १७ फेब्रुवारी रोजी खामगांवच्या नगराध्यक्षा मा.सौ. अपर्णाताई सागर फुंडकर, लॉयन्स क्लबचे प्रथम उपप्रांतपाल एमजेएफ लॉ. राहुल औसेकर, डिस्ट्रीक्ट कॅबिनेट सेक्रेटरी एमजेएफ लॉ. डॉ. प्रदीप गर्गे, जीएसटी को ऑर्डीनेटर एमजेएफ लॉ. सुप्रिया कोतवाल, माजी प्रांतपाल एमजेएफ लॉ. डॉ. अशोक बावस्कर, रिजन चेअरपर्सन लॉ. डॉ. उमाकांत चौधरी, झोन चेअरपर्सन लॉ. डॉ. सागर अग्रवाल यांचे उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी व्यासपीठावर लॉयन्स क्लब खामगाव चे अध्यक्ष एमजेएफ लॉ. तुषार कमाणी, एक्स्पो चेअरपर्सन एमजेएफ लॉ. निखिल लाठे, क्लब सचिव लॉ. डॉ. गिरिश पवार, क्लब कोषाध्यक्ष लॉ. कुणाल भिसे, एक्स्पो सचिव लॉ. डॉ. धनंजय तळवणकर, एक्स्पो कोषाध्यक्ष लॉ. राजेंद्र झांबड, एक्स्पो कन्व्हेनर एमजेएफ लॉ. शंकर परदेशी, लिओ अध्यक्ष पराग खराटे उपस्थित होते.
लॉयन्स संस्थेचे संस्थापक मेल्वीन जॉन्स यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून ध्वजवंदनेने समारोपीय कार्यक्रमाची सुरुवात झाली. क्लब अध्यक्ष एमजेएफ लॉ. तुषार कमाणी यांनी स्वागतपर भाषण केले. लॉ.डॉ. सागर अग्रवाल व लॉ. डॉ. उमाकांत चौधरी यांनी एक्स्पोच्या भव्यतेबाबत प्रशंसा करुन क्लबच्या उपक्रमांची स्तुती केली. लॉ. सुप्रिया कोतवाल यांनी क्लबच्या सेवाकार्याचे कौतुक करुन असेच सेवाकार्य सुरु ठेवण्याबाबत शुभेच्छा दिल्या. प्रथम उपप्रांतपाल पीएमजेएफ लॉ. राहुल औसेकर यांनी लॉयन्स एक्स्पो व्दारे व्यावसायिकांना व्यवसायवृध्दीची संधी तसेच लॉयन्सच्या सेवाकार्यात खामगांवकर जनतेस हातभार लावण्याची संधी प्राप्त झाल्याचे सांगितले. लॉयन्स एक्स्पो व क्लबच्या विविध सेवाकार्यासाठी सर्व क्लब सदस्यांचे अभिनंदन केले. नगराध्यक्षा सौ. अपर्णाताई सागर फुंडकर यांनी आपल्या भाषणात लॉयन्स एक्स्पोच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांना कसा फायदा होतो हे सांगितले व लॉयन्स क्लब खामगांव होकल फॉर लोकल कसे प्रत्यक्षात उतरते हे सांगितले. आभार प्रदर्शन लॉ.डॉ.गिरिश पवार यांनी केले व सुत्र संचालन लॉ. डॉ. परमेश्वर बव्हाण यांनी केले.
याप्रसंगी पुरस्कार प्राप्त स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. प्रथम उपप्रांतपाल लॉ. राहुल औसेकर यांनी लॉयन्स एक्स्यो टीम, लॉयन्स क्लब व लिओ क्लबचे पदाधिकारी व सदस्यांना उत्कृष्ठ आयोजनासाठी एक्स्पो चेअरपर्सन लॉ. निखिल लाठे व इतर सदस्यांना पिन्स देऊन सन्मानित केले. या कार्यक्रमास लॉयन्स तथा लिओ क्लब खामगांवचे सर्व सदस्य, खामगांव नगरीतील गणमान्य नागरिक तसेच पत्रकार बांधव, नांदुरा, भुसावल व नंदुरबार येथून आलेले लॉयन्स सदस्यही उपस्थित होते. असे लॉयन्स क्लबचे प्रसिध्दी प्रमुख लॉ. परमेश्वर चव्हाण, लॉ. श्रमिक जैसवाल व लॉ. विजय मोरखडे यांनी कळविले आहे.


Post a Comment