खामगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये ‘वंदे मातरम’ सामूहिक गायन
खामगाव : वंदे मातरम गीताच्या 150 व्या वर्धापन दिनानिमित्त खामगाव शहर पोलीस स्टेशन येथे आज (दि. 30 मार्च 2026) सकाळी 10.00 वाजता ‘वंदे मातरम’ पूर्ण गीताचे सामूहिक गायन करण्यात आले.या कार्यक्रमात ए. के. नॅशनल हायस्कूलचे सुमारे 50 विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच खामगाव शहर पोलीस स्टेशनचा पोलीस स्टाफ मोठ्या उत्साहात सहभागी झाला होता. देशभक्तीच्या वातावरणात पार पडलेल्या या उपक्रमातून उपस्थितांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ झाली.कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडल्याबद्दल सर्व सहभागींचे कौतुक करण्यात आले.

إرسال تعليق