खामगाव : शिवसेना संघटन बळकटीसाठी आढावा बैठक संपन्न
खामगाव :- शिवसेना नेते तथा केंद्रीय मंत्री मा. ना. श्री प्रतापराव जाधव यांच्या आदेशानुसार खामगाव येथे शिवसेना पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीत संघटना बळकट करण्यासाठी कार्यपद्धती, नियोजन आणि विस्तारावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
सध्या खामगाव विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला पोषक वातावरण असल्याने घराघरात शिवसेना पोहोचवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. मतदारसंघ पुन्हा शिवसेनामय करण्याचे ध्येय प्रत्येक पदाधिकाऱ्याने ठेवावे, असे आवाहन करण्यात आले.
बैठक शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष पाटील डीवरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. मार्गदर्शन करताना त्यांनी “गाव तिथे शाखा” या संकल्पनेनुसार पुनर्गठन करण्याचे निर्देश दिले. गोरगरीब आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यावर भर देण्यास सांगितले. तसेच पक्षविरोधी भूमिका घेणाऱ्या किंवा सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांवर कडक कारवाई करून हकालपट्टी करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.
अँड. अमोल अंधारे यांनी आतापर्यंत 2000 हून अधिक कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश झाल्याची माहिती दिली. आगामी काळात आणखी 5000 कार्यकर्त्यांचा प्रवेश होणार असल्याचे सांगून अफवांना बळी न पडता काम सुरू ठेवण्याचे आवाहन केले. पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांना योग्य सन्मान दिला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
युवासेना लोकसभा अध्यक्ष चेतन पाटील घिवे व उपजिल्हाप्रमुख संजय अवताडे यांनीही पदाधिकाऱ्यांना एकजुटीने काम करण्याच्या सूचना दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुकाप्रमुख राजेंद्र बघे यांनी केले, तर आभार प्रदर्शन शहर प्रमुखांनी केले.
या बैठकीस शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, विद्यार्थी सेना, किसान सेना, अल्पसंख्याक आघाडी, वैद्यकीय मदत कक्ष आदी विविध आघाड्यांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.होते.


إرسال تعليق