मानवतेचा जिवंत नमुना.... एकनिष्ठा
विहिरीत पडलेल्या गाईला जीवाची परवा न करत काढले बाहेर
खामगाव तालुक्यातील सुटाळा खुर्द येथे मानवतेचा जिवंत नमुना पाहायला मिळाला आहे. सार्वजनिक विहिरीत पडलेल्या गाईला तब्बल एक दिवसानंतर सुखरूप बाहेर काढत तिचे प्राण वाचवण्यात गौसेवकांना यश आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 28 मार्च रोजी अजय बोचरे यांच्या आरओ प्लांटसमोरील विहिरीत एक गाय पडली होती. ही बाब 29 मार्च रोजी दुपारी समोर आली. घटनेची माहिती मिळताच एकनिष्ठा गौ सेवा रक्तसेवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुरजभैय्या यादव यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.
जीवाची पर्वा न करता बचावकार्य सुरजभैय्या यादव यांनी दोरीच्या साहाय्याने विहिरीत उतरून अत्यंत धाडसाने रेस्क्यू ऑपरेशन केले. गाईच्या कंबरेला दोरी बांधून तिला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.या बचावकार्यात अजय बोचरे, विशाल कवळे, अकील खान, राजू जवरे, मिलिंद पवार, अमोल बोचरे, जगन्नाथ करांगळे, सुभाष इंगळे, संतोष तायडे, शांताराम धोटे, अजय बोदडे आदींनी सहभाग घेतला.
या धाडसी आणि सेवाभावी कार्याबद्दल सुरजभैय्या यादव आणि त्यांच्या टीमचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे. जनोपचार न्यूज नेटवर्क खामगाव


إرسال تعليق