मुख्याध्यापकाच्या सेवानिवृत्ती निमित्त महाआरोग्य शिबिर
खामगाव : आळसना येथील मुख्याध्यापक श्री. संजय पाटील यांच्या सेवानिवृत्ती निमित्त संजीवन हॉस्पिटल नेत्रालय व क्रिटिकल केअर, खामगाव यांच्या वतीने महाआरोग्य शिबिर घेण्यात आले.
या शिबिरात डॉ. दीपाली सुरुशे पाटील (MBBS, MD Medicine) व डॉ. प्रतीक सुरुशे (MBBS, MS) यांनी नागरिकांची सखोल तपासणी केली. शिबिरात नेत्र तपासणीसह मधुमेह, उच्च रक्तदाब, संधिवात, हृदयविकार, डोळ्यांचे आजार तसेच हात-पायाला मुंग्या येणे यांसारख्या विविध आजारांवर मोफत तपासणी करण्यात आली.
यावेळी रुग्णांना आवश्यक ती मोफत औषधे व आरोग्याविषयी मार्गदर्शनही देण्यात आले. या उपक्रमाला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सेवानिवृत्तीच्या निमित्ताने आयोजित या आरोग्य शिबिरामुळे सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा संदेश देण्यात आला.


إرسال تعليق