जिल्हा पोलीस दलाने वर्ष-2025 मध्ये हरविलेल्या पैकी 87% महिलाचा घेतला यशस्वी शोध

जनोपचार न्यूज नेटवर्क खामगाव :-बुलढाणा जिल्ह्यामध्ये विवीध कारणांनी महिला हरविण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून अशा हरविलेल्या महिलांचा यशस्वी शोध घेण्याचे काम जिल्हा पोलीस दल करीत आहे. पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलीस दलाच्या वतीने हरविलेल्या महिलांचा शोध घेण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय पोलीस नियंत्रण कक्ष बुलढाणा येथे "महिला मिसिंग डेस्क", तर जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन स्तरावर "मिसिंग सेल" कार्यान्वीत करण्यात आलेला आहे. सदर महिला मिसींग डेस्क व मिसींग सेल यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन स्तरावर सुव्यवस्थित समन्वय ठेवून वर्ष-2025 मध्ये अभिलेखावर नोंद असलेल्या एकूण महिला मिसींग प्रकरणा पैकी "87%" महिलांचा यशस्वी शोध घेतला आहे. तर सध्यस्थितीत सन 2021 पासून आज पर्यन्त महिला हरविण्याच्या (मिसींग) प्रलंबीत प्रकरणांची संख्या 284 असून त्यांचा शोध घेण्यासाठी बुलढाणा जिल्हा पोलीस दल सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post