शेलकर यांना जीवे मारण्याची फोनवर आली धमकी, गुन्हा दाखल

खामगाव: निमकवळा येथील रहिवासी, हल्ली मुक्काम खामगाव येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक निलेश गोविंदा शेलकर हे अग्रवाल हॉस्पिटल, जलंब रोड, खामगाव येथे कार्यरत आहेत. दि. 08-03-26 रोजी ते अग्रवाल हॉस्पिटल येथे हजर असतांना, त्यांना त्यांच्या मोबाईलवर एका अज्ञात व्यक्तीचा 9554989325 या मो. क्रमांकावरून कॉल आला व त्या व्यक्तीने दटावून सांगितले की, तू व तुझा मित्र वैभव चरखे, स्वयंसेवक संघाचे काम करता, यापुढे संघाचे काम दोघांनी करू नये, केल्यास दोघांनाही जीवे मारून टाकण्याची धमकी दिली. 

यावरून निलेश शेलकर यांनी काही स्वयंसेवकांना सोबत घेऊन शहर पोलीस स्टेशन खामगाव येथे वरील अज्ञात आरोपीचा मो. नंबर वरून शोध घेऊन कार्यवाही करणे करिता तक्रार अर्ज दाखल केला आहे.

 यावरून पोलिसांनी बी. एन. एस. कलम 351(2) व 351(4) नुसार गुन्हा दाखल केला असून कर्तव्यदक्ष  ठाणेदार श्री रामकृष्ण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीचा शोध सुरू आहे. या धमकीमुळे स्वयंसेवकां मध्ये खळबळ उडाली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post