स्व.संजय ठाकरे पाटील यांची जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :- भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, जिल्हा परिषदचे माजी सदस्य तथा सकल मराठा सेवा संघटना व छत्रपती प्रतिष्ठानचे संस्थापक स्व. संजय ठाकरे पाटील यांची जयंती दि.६ मार्च रोजी विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली.
सर्वप्रथम सकाळी ९ वाजता जलंब नाका स्थित सकल मराठा सेवा संघटनेच्या कार्यालयात स्व.संजय ठाकरे पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर सकाळी ९.३० वाजता जिल्हा सामान्य रुग्णलयात रुग्णांना फळ वाटप, १० वाजता लॉयन्स क्लब खामगाव द्वारा संचालित लॉयन्स अन्नछत्र येथे रुग्णालयातील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना भोजनदान, ११ वाजता जलंब नाका स्थित सकल मराठा सेवा संघटनेच्या कार्यालयासमोर वाटसरूंसाठी मोफत पाणपोईचे उद्घाटन, ११.३० वाजता स्व. संजयभाऊ ठाकरे पाटील बळीराजा आत्मसन्मान योजनेअंतर्गत आत्महत्याग्रस्त कुटुंबाला आर्थिक मदत, दुपारी १.३० वाजता रेल्वे स्टेशन येथे खामगाव अनाथ, अनवानी व्यक्तींना स्लिपर चप्पलचे वितरणासह आदी लोकोपयोगी कार्यक्रम राबविण्यात आले.
या कार्यक्रमांना काँग्रेसचे खामगाव विधानसभा मतदार संघ समन्वयक ज्ञानेश्वरदादा पाटील, काँग्रेस तालुका अध्यक्ष तेजेंद्रसिंह चौहान, ओबीसी विभागाचे सचिव अजय तायडे, अल्पसांख्यक विभागाचे सचिव मो.वसीमुद्दीन,जिल्हा कांग्रेस उपाध्यक्ष जुलकर नैन शेख चांद, जेष्ठ नेते राजाराम कालने,खामगाव शहर अध्यक्ष स्वप्निल ठाकरे पाटील, शहर कार्याध्यक्ष किशोरआप्पा भोसले, डॉ.निखिल ठाकरे, अतुल शिरसाठ,संतोष देशमुख, नगरसेवक मूसा भाई, सुरेशसिंह तोमर, अस्लम पटेल, प्रकाश टिकार,सचिन जयसवाल ,अनंता ताठे,निलेश देशमुख, गजानन देवचे, वासुदेव सोळंके, कैलास ताठे ,पवन लांडे, जगदीप चौधरी, किशोर गवांडे ,शामराव लांडे, दामोदर ताठे, संजय तायडे, प्रमोद चिंचोलकर , कैलास साबे, गजानन मुळीक, अजय पवार, अक्षय पात्रे, विनोद माळवंदे, सतेंद्र ठाकुर ,अक्षय शंकरवार पंकज गमे,नितीन पाटील, सुमित बेंद्रे, जालिंदर चौधरी, रूपेश पाकधाने, भारत पाटिल ,अंकित डिडवाणीया,संजय जवंजाल,सुधाकर डुकरे ,शुभम कालूसे,शैलेश चोपड़े ,मसब ख़ान ,वैभव गायकवाड़ ,भूषण पथरे ,संजय खराटे, गोपाल मारखेड़े , संतोष चव्हाण, श्रीनाथ पांडे ,दीपक ठाकरे, जय बघेल , अमीत तायडे,घनश्याम सावरकर ,अनिल ठाकरे , पंकज घोगले,अजिंक्य कंकाले ,विलास नवसागर,लोमेश भोयर,प्रमोद हिंगने , श्रीहरि टीकार,विट्ठल पाटिल ,गजानन हींगने ,पुरशु रामेकर यांच्यासह यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री छत्रपती प्रतिष्ठान, स्व.संजय ठाकरे पाटील चॅरिटेबल ट्रस्ट खामगावच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.


إرسال تعليق