आरोग्य जनजागृतीसाठी तरुण डॉक्टर मैदानात...
डॉ. तुषार गोंधणे यांचा बुलढाणा जिल्ह्यात सामाजिक पुढाकार
जनोपचार न्यूज नेटवर्क खामगाव :- आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे तसेच रासायनिक उत्पादने, प्रदूषण आणि अयोग्य औषधांच्या वापरामुळे त्वचा व केसांच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहेत. अनेक नागरिक योग्य माहितीअभावी चुकीच्या उपचारांच्या जाळ्यात अडकत असल्याचेही चित्र दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर चिखली येथील तरुण त्वचारोग तज्ज्ञ डॉ. तुषार गोंधणे यांनी सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत नागरिकांच्या आरोग्य जनजागृतीसाठी पुढाकार घेतला आहे. डॉ. गोंधणे हे बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांमध्ये त्वचा व केसांच्या आजारांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. नागरिकांना योग्य आरोग्य माहिती मिळावी, चुकीच्या औषधोपचारांपासून लोकांनी दूर राहावे आणि योग्य वेळी योग्य उपचार मिळावेत यासाठी ते विविध माध्यमांतून मार्गदर्शन करत आहेत. याचबरोबर गोरगरीब व सर्वसामान्य जनतेपर्यंत परवडणारी आणि योग्य आरोग्य सेवा पोहोचवणे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून हा सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे. विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू रुग्णांची सेवा करण्याच्या हेतूने त्यांना योग्य वैद्यकीय सल्ला व उपचार मिळावेत यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. भविष्यात बुलढाणा जिल्ह्यातील विविध भागांत आरोग्य जनजागृती कार्यक्रम, आरोग्य शिबिरे आणि मार्गदर्शन उपक्रम राबवून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्याचा त्यांचा मानस आहे. आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत योग्य आरोग्य सेवा पोहोचणे ही डॉक्टर म्हणून आपली सामाजिक जबाबदारी आहे, फ्फ असे मत डॉ. तुषार गोंधणे यांनी व्यक्त केले. डॉ. तुषार गोंधणे यांच्या या सामाजिक पुढाकाराचे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात स्वागत होत असून त्यांच्या या उपक्रमामुळे समाजात आरोग्याबाबत सकारात्मक जनजागृती होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

إرسال تعليق