साप चावल्याने 33 वर्षीय मंगेश कांबळे चा मृत्यू : जनुना गावात शोककळा
जनोपचार न्यूज नेटवर्क खामगाव :-पकडलेल्या सापाला जंगलात सोडून देण्याकरिता गेलेल्या मंगेश कांबळे या 33 वर्षीय युवकाला विषारी सापाने दौंश केला. यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची घटना आज ९ मार्च रोजी सकाळी साडेदहा वाजता च्या सुमारास घडली. मंगेश कांबळे हा सर्पमित्र असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. त्याने पकडलेल्या एका विषारी सापाला जीवदान देण्याकरिता जंगलात सोडण्याचा प्रयत्न केला मात्र असतर्क असलेल्या मंगेशला सापाने पलटवार करून दौंश केला. सापाचे विष तरुणाच्या अंगात झपाट्याने फैलले. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले परंतु प्रकृती गंभीर असल्याने सामान्य रुग्णालयातून त्यांना अकोला रेफर करण्यात आले. अकोला पोहोचण्यापूर्वीच मंगेश कांबळे ची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे जणूना गावात शोककळा पसरली आहे.. जनोपचार न्यूज नेटवर्क कडून भावपूर्ण श्रद्धांजली

إرسال تعليق