विश्वप्रार्थनेचे चिंतन म्हणजे सुखी जीवनाचा पासवर्ड – संतोष तोत्रे
खामगाव : अंतर्मनाला सातत्याने बहिर्मनाच्या माध्यमातून सूचना मिळाल्या की अंतर्मन त्या स्वीकारते. सातत्याने शुभचिंतन व सकारात्मक विचार बहिर्मनाद्वारे अंतर्मनात पोहोचले तर जीवनात सकारात्मक बदल घडल्याशिवाय राहत नाही. सद्गुरू समाजसुधारक वामनराव पै यांनी दिलेल्या विश्वप्रार्थनेचे चिंतन म्हणजे सुखी जीवनाचा खरा पासवर्ड आहे, असे प्रतिपादन प्रबोधक संतोष तोत्रे (पुणे) यांनी केले.
जीवनविद्या मिशन केंद्र मलकापूर उपकेंद्र खामगाव यांच्या वतीने दिनांक ७ व ८ मार्च (शनिवार व रविवार) रोजी सायंकाळी ७.३० ते ९.३० या वेळेत स्थानिक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर स्मारक सभागृहात “सुखी जीवनाचा पासवर्ड” या विषयावर समाजप्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
दोन दिवसीय या कार्यक्रमात प्रबोधक संतोष तोत्रे यांनी उपस्थितांना जीवनविद्येच्या तत्त्वज्ञानाचे सोप्या व प्रभावी भाषेत मार्गदर्शन केले. सद्गुरू वामनराव पै यांनी दिलेली विश्वप्रार्थना ही सकारात्मक विचार, आत्मपरीक्षण आणि मानवतेचा संदेश देणारी आहे. विश्वप्रार्थनेचे नियमित चिंतन केल्यास मनात शांतता, समाधान आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे जीवन अधिक आनंदी, संतुलित आणि यशस्वी बनते, असे त्यांनी सांगितले.
जीवनविद्या मिशनद्वारे समाजाला जीवनविद्येच्या माध्यमातून अत्यंत निरपेक्षपणे व सातत्याने मार्गदर्शन केले जात असून जीवन सुखाचे, शांतीचे व समृद्धीचे करण्यासाठी हे तत्त्वज्ञान समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे. कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला खालील नाम धारकांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले
गजानन उमाळे अध्यक्ष जीवन विद्या मिशन उपकेंद्र खामगाव, प्रफुल्लता उमाळे,सुभाष टाले सचिव, चित्रा टाले,पांडुरंग ठाकरे कोषाध्यक्ष, प्रमिला ठाकरे, संजय उमरकर, उज्वला उमरकर अनिता सातव, अरविंद सातव, अशोक अनासने,मंगला अनासने, दिव्या अनासने, विजय तराडे, सविता तराळे,अनिल बंड, मीनाक्षी बंड,विजय पळसकर, माधुरी पळसकर, राजेश पळसकर,अनिता पळसकर, विशेष मार्गदर्शन ज्ञानसाधना केंद्र मलकापूर चे अध्यक्ष पुरुषोत्तम टेकाळे व शैलजा टेकाळे यांनी तर अभंग व हरिपाठ गायन भराटे मलकापूर यांनी आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश देशमुख मलकापूर यांनी केले.

إرسال تعليق