सागरदादा फुंडकर यांच्याहस्ते शेतकरी बांधवांसाठी शिदोरीगृहाचे उद्घाटन
जनोपचार न्यूज नेटवर्क खामगांव:- बाहेर गावाहुन शेतमाल विक्रीसाठी आलेला शेतकरी बांधव उपाशी पोटी राहता कामा नये ही बाब लक्षात घेता खामगांव कृषि उत्पन्न बाजार समिती येथे आज बुधवार दिनांक ०४ मार्च २०२६ रोजी भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश सोशल मिडीया सह संयोजक श्री सागरदादा फुंडकर यांच्याहस्ते शिदोरी गृहाचे उद्घाटन करण्यात आल
विदर्भातील नामवंत बाजार समिती म्हणुन सर्वत्र सुपरिचीत असणारी खामगांव कृषि उत्पन्न बाजार समिती येथे जिल्हयासह बाहेर जिल्हातुन सुद्धा शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात आपला शेतमाल घेवुन विक्रीसाठी येतात. घरातुन लवकरच बाहेर पडावे लागत असल्याने त्यांना शेतमालाची विक्री होवुन पैसे हातात मिळेपर्यंत उपासमार करत दिवस काढावे लागत होता. हीच बाब लक्षात घेता त्यांना दिवसभर उपाशीपोटी राहत कामा नये व यादरम्यान त्यांच्या जेवनाची काय व्यवस्था करता येईय या उदांत हेतुने बाजार समितीच्या वतीने शिदोरी गृहाचे आज शुभारंभ करण्यात आला. यामध्ये शेतकरी बांधवांना फक्त ५ रुपयांमध्ये भरपेट जेवण मिळणार आहे. अडते यांचा १० रुपयांचा वाटा तर शेतकरी बांधवांचा ५ रुपयांचा वाटा यामध्ये राहील.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माऊली ग्रुपचे अध्यक्ष तथा खामगांव विधानसभा मतदार संघाचे पक्षनेते श्री. ज्ञानेश्वरदादा पाटील हे होते. त्यांनी अध्यक्षीय भाषणात बाजार समितीने सुरु केलेले शिदोरी गृह हे निश्चितच शेतकरी बांधवांच्या हितसाठी उपयुक्त ठरणार आहे व याद्वारे शेतकऱ्यांचा आत्मा तृप्त होईपर्यंत त्यांना सुंदर जेवण वितरीत करावे तसेच बाजार समितीच्या वतीने शेतकरी बांधवांसाठी जास्तीत जास्त उपक्रम व योजना राबविल्या जाव्यात असे सांगितले.
याप्रसंगी बाजार समितीचे सभापती श्रीकृष्ण टिकार, उपसभापती संघपाल जाधव, सेवक समिती प्रमुख राजेश हेलोडे, लायसन्स प्रमुख. मंगेश इंगळे, संचालक सर्वश्री गणेश माने, विनोद टिकार किंमत कोकरे यांच्यासह सुरेश तोमर, रामकृष्ण भारसाकळे, अजय तायडे, पंजाबराव देशमुख, निलेश देशमुख, मनिष देशमुख, मोरेजी यांच्यासह शेतकरी बांधव व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, संचलन व आभार बाजार समितीचे शासकीय सचिवo. गजानन आमले यांनी केले.

إرسال تعليق