स्व. संजय ठाकरे पाटील यांच्या जयंती निमित्त विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन



जनोपचार न्यूज नेटवर्क खामगाव : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, जिल्हा परिषदचे माजी सदस्य तथा सकल मराठा सेवा संघटना व छत्रपती प्रतिष्ठानचे संस्थापक स्व. संजय ठाकरे पाटील यांच्या जयंती निमित्त 6 मार्च 2026 रोजी विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

          स्वर्वप्रथम सकाळी ९ वाजता जिल्हा सामान्य रुग्णालय खामगाव येथे रुग्णांना फळवाटप, सकाळी १० वाजता लॉयन्स क्लब खामगाव द्वारा संचालित लॉयन्स अन्नछत्र येथे जिल्हा सामान्य रुग्णालयातील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना भोजनदान, ११ वाजता जलंब नाका स्थित सकल मराठा सेवा संघटनेच्या कार्यालयासमोर वाटसरूंसाठी मोफत पाणपोईचे उद्घाटन, ११.३० वाजता स्व. संजयभाऊ ठाकरे पाटील बळीराजा आत्मसन्मान योजनेअंतर्गत आत्महत्याग्रस्त कुटुंबाला आर्थिक मदत, दुपारी १.३० वाजता रेल्वे स्टेशन येथे खामगाव अनाथ, अनवानी व्यक्तींना स्लिपर चप्पल वाटप करण्यात येणार आहे. कार्यक्रमांना मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सकल मराठा सेवा संघ, श्री छत्रपती प्रतिष्ठान, खामगाव, स्व. संजय ठाकरे पाटील चॅरिटेबल ट्रस्ट खामगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

أحدث أقدم