खामगावकरांसाठी दिलासा;शासकीय कार्यालय परिसरात आधार सेवा केंद्र कार्यान्वित

खामगाव -  तालुक्यातील नागरिकांची आधार कार्ड सेवा संदर्भातील ससेहोलपट थांबविण्यासाठी आता प्रशासनाने पुढाकार घेतल्याचे दिसत आहे .खामगाव येथे तहसील कार्यालय परिसरात दोन आधार सेवा केंद्र शासनातर्फे कार्यान्वित करण्यात आली आहेत. 

जाहिरात

यामुळे आता नागरिकांना खाजगी केंद्रावर चकरा मारण्याची गरज उरणार नाही .दोन्ही आधार सेवा केंद्र शासनाच्या अखत्यारीत असून या केंद्रांवर नागरिकांना नवीन आधार नोंदणी, बायोमेट्रिक अपडेट ,पत्ता व नाव दुरुस्ती, मोबाईल नंबर लिंक करणे, दस्तऐवज अद्ययावत यासारख्या सर्व सुविधा शासनाने ठरवून दिलेल्या दरात उपलब्ध होतील. प्रशासनाने पुढाकार घेऊन हे आधारसेवा केंद्र प्रशासकीय इमारतीच्या  सोयीच्या ठिकाणी कार्यान्वित केली आहेत . त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना शहरातील खाजगी आधार केंद्रांवर पायपीट करण्याची आता गरज पडणार नाही. विशेषतः उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांनी वैयक्तिक लक्ष देऊन ही सुविधा सुरू केल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post