जागतिक महिला दिनी मोफत आरोग्य तपासणी शिबीर

खामगाव  - जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी व निशुल्क औषध वाटप शिबिराचे आयोजन रविवार ८ मार्च रोजी करण्यात आले आहे.

दिव्य तेज निसर्गोपचार केंद्र, महारुद्र अपार्टमेंट, सुटाळा खुर्द येथे सकाळी ११ ते ५ वाजेदरम्यान हे शिबीर होणार आहे. शिबिरात योग व निसर्गोपचार तज्ज्ञ डॉ. नितीन निमकर्डे हे रुग्णांची तपासणी करतील. यामध्ये गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, पाठदुखी, सर्व प्रकारची सांधेदुखी, हातापायात मुंग्या येणे, एक पाय दुखणे, पोटऱ्या दुखणे, सर्व प्रकारचे वात विकार, रक्ताल्पता, थकवा, कमजोरी, एलर्जी, नेहमीची सर्दी, मधुमेह, रक्तदाब, एसिडिटी, हायपर एसिडिटी, अल्सर, पोटाचे विकार, मूळव्याध, बद्धकोष्ठ, महिलांचे विविध आजार, पाळीशी संबंधित तक्रारी इत्यादी जुनाट आजारांनी पीडित महिला रुग्णांची मोफत तपासणी करून त्यांना आयुर्वेदिक, नैसर्गिक औषधीचे निशुल्क वितरण करण्यात येणार आहे. तरी गरजू महिलांनी या संधीचा लाभ घ्यावा. शिबिरात नावनोंदणी करण्यासाठी मोबाईल क्रमांक ८७६७६३६०९८ यावर संपर्क साधावा असे आवाहन आयोजक निसर्गशक्ती बहुद्देशीय संस्था गोंधनापूर च्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post