'स्व' जागरणातून राष्ट्र जागरण 

खामगाव,  संस्कृती ही प्राचीन महान असून, त्याचेच आपण वाहक आहोत. रामकृष्णांचा वारसा सांगणारे आम्ही आपला 'स्व' विसरल्यामुळे अनेक संकटांमध्ये सापडलेलो आहोत. त्यामुळे आपला 'स्व' जागृत करून त्यातून कुटुंब व राष्ट्रनिर्मिती करण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन भारतीय विचार मंचाचे जिल्हा संयोजग मिलिंद काळे यांनी खामगाव नगरातील केशव वस्तीमधील हिंदू संमेलनामध्ये केले.


कार्यक्रमाची सुरुवात केशव वस्तीतून करण्यात आलेल्या सांप्रदायिक दिंडीने झाली. दिंडीमध्ये वस्तीतील नागरिक, माता-भगिनी मोठ्या उत्साहाने सहभागी झाल्या. प्रमुख अतिर्थीच्या हस्ते भारतमाता पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले.

महिला सक्षमीकरण तसेच युवती जर संस्कारीत झाली तर सर्व समस्या सोडवण्यात तत्पर होईल, असे मत राष्ट्रसेविका समितीच्या बुलढाणा विभाग सहकार्यवाहिका कीर्ती काशीकर यांनी मांडले.

जाहिरात @2 

संत तुकारामांच्या धर्माचे पालन करणे पाखंड खंडन या अभंगाद्वारे धर्माप्रती आपली कर्तव्य काय आहेत, हे भागवताचार्य प्रभूरंजन महाराज सहस्त्रबुद्धे (गायगाव खु.) यांनी सांगितले

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी आयोजन समितीचे अॅड. आशुतोष अग्रवाल, हर्षद जोशी, सीएगुलराज आयलाणी, हेमंत खेकाळे आणि सचिन तांबट यांनी परिश्रम घेतले. संचालन व आभार प्रदर्शन विनय वरणगावकर यांनी केले. यानंतर सर्वांना श्री हनुमान चालीसा पुस्तिका व प्रसाद वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचा शेवट देवयानी खेकाळे हिने गायलेल्या पसायनाने झाला. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक व माता-भगिनी उपस्थित होत्या.

Post a Comment

Previous Post Next Post