आदर्श ज्ञानपीठ च्या विद्यार्थ्यांचे श्रीरामनवमीच्या शोभायात्रेत विशेष सादरीकरण

       आदर्श ज्ञानपीठ इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज खामगाव येथे रामनवमीचा उत्सव वर्ष परंपरेनुसार खामगावातील मोक्याचे ठिकाण असलेले फरशी येथे निघणाऱ्या श्रीराम यांच्या मिरवणुकी दरम्यान नृत्य देखावा सादर करून  साजरी करण्यात आली.

            कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांनी सादर केलेले श्रीराम प्रभू यांच्या जीवनावर आधारित नृत्य देखावा. या नृत्यविश्कारातून विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृतीचे वैभव आणि परंपरेची झलक, श्रीराम प्रभू यांचे जीवनातील त्याग,समर्पण,संयम,एक वचन या सर्व गुणांचे प्रभावीपणे सादर केले उपस्थितांनी या सादरीकरणाचे जोरदार कौतुक केले.

         श्रीरामनवमी मिरवणुकीचे प्रमुख, सदस्य,अतिथी तसेच शहरातील प्रतिष्ठित नागरिक यांच्या हस्ते आदर्श ज्ञानपीठ संस्थेचे सदस्य कविश्वरसिंह राजपूत  यांचा मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला व विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित झाला जेव्हा मान्यवरांनी त्यांच्या भक्तिमय आणि सुंदर सादरीकरणाचे भरभरून कौतुक केले . या कार्यक्रमाला आदर्श ज्ञानपीठच्या पालकांचा तसेच खामगावकरांचा उत्तम प्रतिसाद लाभला. मोठ्या संख्येने उपस्थित राहून पालकांनी विद्यार्थ्यांचे उत्साहवर्धन केले आणि कार्यक्रमाचे मनापासून कौतुक केले. 

             सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या परीक्षा कालावधीमध्ये त्यांचा अभ्यासक्रम व नृत्य देखावा यांचे उत्तम सांगड घातली. कार्यक्रमादरम्यान प्रभू श्रीराम यांच्या जीवनावर आधारित माहिती देण्यात आली तसेच विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्ये आणि संस्कार रुजविण्याचा संदेश देण्यात आला.

        शाळेच्या शिक्षक वृंदांनी कार्यक्रमाचे नियोजन उत्कृष्टरित्या केले. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सांस्कृतिक जाणीव वाढीस लागली असून अशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो असे मत उपस्थितांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काजल होणवलकर यांनी केले तर 

 कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता संस्थेचे सदस्य कवीश्वर सिंह राजपूत, शाळेच्या प्राचार्या अनिता पळसकर, पर्यवेक्षिका प्रियंका राजपूत ज्येष्ठ शिक्षिका ममता महाजन व आदर्श ज्ञानपीठाचे सर्व शिक्षक वृंद तसेच कर्मचारी वर्ग यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Post a Comment

Previous Post Next Post