सजनपुरी ग्रामपंचायत मधील कारभाराविरोधात सोनू कौशल यांचे उपोषण: आज दुसरा दिवस, प्रकृती खालावली

सजनपुरी (ता. खामगाव) : ग्रामपंचायत सजनपुरी येथे यंदा छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी न केल्याच्या निषेधार्थ आणि ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करण्याच्या मागणीसाठी सोनू कौशर यांनी सुरू केलेल्या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. दरम्यान, उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावत असल्याची माहिती समोर आली आहे.

 शिवजयंतीसारखा महत्त्वाचा उत्सव न साजरा होणे ही गंभीर बाब असून यामागील कारणांची चौकशी व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे. तसेच ग्रामपंचायतीतील आर्थिक गैरव्यवहार आणि कामकाजातील अनियमितता यावरही कारवाई व्हावी, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.

उपोषणकर्ते सोनू कौशर यांच्या प्रकृतीत बिघाड होत असल्याने गावात नाराजी व्यक्त होत असून प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे. प्रशासनाच्या भूमिकेबाबत ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Post a Comment

أحدث أقدم