खामगाव: 2 एप्रिलला आठवडी बाजार बंद
खामगाव : खंडोबा १२ गाड्या यात्रा महोत्सवानिमित्त शहरातील वाहतूक व कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी दिनांक 2 एप्रिल 2026 रोजी खामगाव येथील आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाने दिले आहेत.
जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्या आदेशानुसार, गुरुवारी पार पडणाऱ्या यात्रेमुळे शहरातील जांबोरा रोड, आठवडी बाजार परिसर व कमलेश सिंह चौक या मार्गांवर मोठ्या प्रमाणात गर्दी व वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. तसेच आठवडी बाजारात मोठ्या संख्येने नागरिक खरेदीसाठी येत असल्याने परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते.
या पार्श्वभूमीवर पोलीस विभाग व नगर परिषद यांचा अहवाल विचारात घेऊन 2 एप्रिल रोजी आठवडी बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक ती कार्यवाही करून अहवाल सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, या निर्णयामुळे यात्रेच्या दिवशी शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यास मदत होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

إرسال تعليق