खामगाव जलंब पॅसेंजर चा विस्तार करून ट्रेन थेट अमरावती सुरू करावी: एनसीपी नेते डॉ तायडे
खामगाव ते जळंब पैसेंजर ट्रेन दिवसांतून ३/४ वेळ धावते. त्या गाडीचा विस्तार अमरावती पर्यंत करावा अशी जनहिताची मागणी दिनांक २४ मार्च रोजी एनसीपी शरद पवार गटाचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ संतोष तायडे यांनी श्री अश्विनी वैष्णव रेल्वे कैबिनेट मंत्री याना मेल द्वारे केली आहे. या गाडीचा उपयोग खामगाव बुलढाणा चिखली देऊळगाव राजा सिंदखेड राजा मेहकर लोणार इत्यादी तालुक्यातील प्रवाशांना होणार आहे असे नमूद करण्यात आले आहे.
राज्य सरकारच्या एस टी बसेस या खामगाव आणि इतर ठिकाना वरून अमरावती साठी धावतात परंतु त्यांचे तिकीट दर प्रवाशांना परवडत नसल्याने ट्रेन सुरू करावी असे नमूद केले आहे.या ठिकाना वरून बरेच लोक आणि प्रशासकीय अधिकारी कर्मचारी अमरावती येथे विभागीय कार्यालयात जातात, विशेष म्हणजे सुट्टी काळात इतर ट्रेन वर असणारी गर्दी देखील कमी होऊन त्यांच्यावरील ताण कमी होण्यास मदत होईल. ट्रेन खामगाव -जळंब-शेगाव-अकोला-मूर्तिजापूर-बडनेरा-अमरावती या मार्गाने धावणे शक्य होईल अशी विनंती डॉ संतोष तायडे यांनी रेल्वे मंत्र्यांना केली आहे.


Post a Comment